१४ दिवसापासून सुरू आहे रामाळा तलावाची स्वच्छता

0
102
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• श्रमदान मध्ये विविध संस्था संघटनाचा पुढाकार
• गोंडकालीन वारसा जपण्यासाठी एकवटले हजारो हात
• स्वच्छता अभियानास महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांची भेट

चंद्रपूर : आज इको-प्रो तर्फे १४ व्या दिवसापासून रामाळा तलावाची स्वच्छता सुरू आहे. गोंडकालीन वारसा जपण्यासाठी हजारो हात श्रमदानाकरिता एकवटले असून इको-प्रो संस्थेच्या सदस्यासोबत विविध संस्था-संघटनाच्या युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आज रविवारी महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांनी भेट दिली.

इको-प्रो तर्फे रामाळा तलाव संवर्धन करिता करण्यात आलेल्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनानंतर 15 मार्च पासून नियमित रोज सकाळी रामाळा तलाव स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. आज रविवारी नांदगाव येथील शिव छत्रपती प्रचारक मंडळ चे युवक, जंगल जरनी या महिला ग्रुप च्या महिला व इको-प्रो महिला मंच च्या महिला सहभागी झाल्या होत्या.
आज श्रमदान अभियानात तलावातील प्लास्टिक संकलन करण्यात आले, तसेच विसर्जन दरम्यान विसर्जित केलेले मडकी, दिवलण्या, जलपात्र, कापड जमा करून तलाव स्वच्छ करण्यात आले. तसेच एक देऊळ ते बगड खिडकी 1999 मध्ये रामाळा उद्यान निर्मिती वेळेस तयार करण्यात आलेला पर्यटन रस्ता सुद्धा स्वच्छता करण्यात येत आहे. या रस्ताचा वापर नसल्याने अतिक्रमण झाले होते, झाडी-झुडपे वाढली होती त्याची स्वच्छता यापूर्वी किल्ला स्वच्छता दरम्यान केली होती दरम्यान या रस्ताचा काहीच वापर न झल्याने झुडपे वाढली ती परत स्वच्छता करण्यात येत आहे.

आज महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी रामाळा तलावास भेट देत श्रमदान तसेच तलावातील आवश्यक करावयाची कामाबाबत पाहणी केली. श्रमदान मध्ये सहभागी सदस्य व नागरिकांचे कौतुक केले व आपला वारसा असलेल्या तलाव व किल्ला संवर्धन करिता नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी केले. तलावाच्या कामास गती देण्यास पालिका कडून करावयाच्या आवश्यक कामाची माहिती यावेळी बंडू धोतरे यांनी आयुक्त यांना दिली.

आजच्या श्रमदानात शिव छत्रपती प्रचारक मंडळ नांदगाव पोडे मार्गदर्शक बंडू काकडे, दीपक तुरानकर, अध्यक्ष महेंद्र डोये उपाध्यक्ष नितेश येग्गेवार, प्रदीप भोयर सह अनेक नांदगाव मधील युवक, जंगल जरनी च्या चित्रा इंगोले, वंदना मून, वैशाली फुलकर, विद्या चित्रीव तर इको-प्रो महिला मंच च्या योजना धोतरे, भारती शिंदे, मोनाली बुरडकर, नीता रामटेके, मनीषा जयस्वाल तसेच सामाजिक कार्यकर्ते किशोर जामदार, अमर गेही, चांदा पब्लिक स्कूल चे अमर सर व इको-प्रो सदस्य व नांदगाव मधील युवक सहभागी झाले होते.