घुग्घुस : अखेर सहा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधी नंतर महाविकास आघाडी शासनाने जिल्ह्यातील दारूबंदी हटविली. ही दारू बंदी उठविण्याचा विडाच जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी उचलला होता व त्यांच्या साथीला खासदार बाळु धानोरकर सुद्दा मेहनत घेत होते. त्यांच्या मेहनतीला फळ आले.
माजी पालकमंत्री यांनी वाजत – गाजत जिल्ह्यात दारूबंदी केली मात्र अंमलबजावणी ही शून्यच होती त्यामुळे घरपोच दारू मिळत होती. अनेक अल्पवयीन शाळेकरी मुलं कमी वेळेत पैशे कमविण्यासाठी दारू तस्करीत उतरले यासोबतच मोठ्या संख्येने महिला ही तस्करीच्या धंद्यात आल्या घुग्घुस हे शहर यवतमाळ जिल्ह्यच्या वेशीवर असल्याने वर्धा नदीच्या दोन्ही बाजूने कोट्यवधी रुपयांची दारू तस्करी व्हायची अनेक लोकांवर तस्करीचे गुन्हे दाखल झाले यात लहान मुलं व महिला यांचा मोठा समावेश आहे. अनेक तरुण तस्करीत उतरल्याने संघटित गुन्हेगारी वाढीस लागली होती.
झटपट पैशे कमविण्याच्या नादात लहान मुलासह तरुण युवकांचे ही आयुष्य बरबाद होत होते.
आता दारूबंदी मुळे या वाईट प्रवृत्तीवर आळा बसेल तसेच मद्यप्रेमी मजूर हे महागडी दारू विकत घेऊन पित असल्याने त्यांच्या कुटुंबाची ही वाताहत होत होती.
यासोबतच गुन्हेगार ऐवढे बेलगाम झाले होते की पोलिसांच्या जीवावर उठण्यास ही मागे पुढे पाहत नव्हते तिथे सामान्य नागरिकांच्या जीवांची काय बिशाद ?
घुग्घुस पोलीस स्टेशनला सेवा देणारे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी छत्रपती चिडे यांना तस्करांच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला होता. यामुळे महाविकास आघाडी शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह असून पालकमंत्री साहेबांनी आपला शब्द पूर्ण केल्या बद्दल घुग्घुस काँग्रेस कमेटी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते अशी भावना राजुरेड्डी यांनी व्यक्त केली.