दारुतस्करीसाठी संघटित टोळ्यांची साखळी सक्रीय…

0
452
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

जिल्ह्यात एकही थेंब दारु येऊ देणार नाही, म्हणणा-या जिल्हा पोलीस अधीक्षकांचे शब्द हवेतच विरले

चंद्रपूर : यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात राजुर काॅलरी येथे जयस्वाल, वणी येथील डोर्लीकर व भालर काॅलनीत तिवारी, कैलासनगर (मुंगोली) या देशी दारुच्या भट्टीतून चंद्रपूर जिल्ह्यात दारु तस्करी होत आहे. याकामी साखळी तयार करुन टोळीद्वारे दारु तस्करीचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांकडून ५ ते १० पेटी नेणा-या दारु तस्करांना पकडून कारवाही केली जाते. परंतु संघटित टोळ्यांच्या मोरक्यावर पोलिसांची मेहरनजर असल्याचे दिसून येत आहे.

२०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात संपुर्ण दारूबंदी घोषित करण्यात आली होती. नागभीड येथे उपपोलीस निरीक्षक छत्रपती चिडे या कर्तव्यदक्ष पोलीस अधिका-याची दारु तस्करांनी हत्या केली. तेव्हा चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस प्रशासन हादरले होते. तेव्हा चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दारु तस्करांवर मकोका लावण्याची घोषणा केली. दारूचा एकही थेंब जिल्ह्यात येणार नाही असे सांगितले होते. कालांतराने हे आव्हान हवेतच विरले. बंदीच्या दिवसापासूनच चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारूचा महापूर वाहत आहे. यात राजकीय नेत्यांसह पोलीस विभागाचे अनेक कर्मचारीही सहभागी असल्याचे अनेक कारवाईतून उघड झाले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असतानाही यवतमाळ जिल्ह्यातून छुप्या मार्गाने अवैद्य दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. यावर अंकुश लावण्यासाठी सिमा परिसरात नाकाबंदी केली जाते आणि सीमा मार्गावर ही तपासणी केली जाते. तरी सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात दारूचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा कारवाईत पोलीस कर्मचारी राजकीय कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सापडू लागल्याने अवैध दारू विक्री नेमक कोण मोहरे पुढे आहेत हे स्पष्ट होते.
दिवसेदिवस या तस्कऱ्याची हिमत वाढत असून, चंद्रपूर येथील आमदार किशोर जोरगेवार यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्याइतपत यांची मजल वाढली आहे.

एकंदरीत दारू तस्करीचे वाढते जाळे व गुन्हेगारी बघता चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी 02 सप्टेंबर रोजी किंवा त्यापुढे दारुबंदी उठविण्या संदर्भात बैठक लावून शक्य तितक्या लवकर दारुबंदी हटविण्यात यावी या करिता निवेदन दिले आहे.

-> भालर येथील भट्टी मधील दारू तस्करिचा स्ट्रिंग ऑपरेशन विडिओ नक्की पहा…