अल्ट्राटेक कंत्राटी कामगारांच्या समस्या येत्या पंधरा दिवसात मार्गी लागणार

0
520
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

पालक मंत्री वडेट्टीवार यांनी कंपनी व्यवस्थापनाला खडसावले पंधरा दिवसात समस्या निकाली काढा अन्यथा परिणामास सामोरे जावे लागेल

पुढील आठवड्यात मुंबई येथे सी एल सी आणि आर एल सी व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक

नांदा फाटा (चंद्रपूर) : मागील वर्षभरापासून अल्ट्राटेक सिमेंट कंपनी मध्ये काम करत असलेल्या कंत्राटी कामगारांच्या अनेक समस्यांना घेऊन कामगारांच्या समस्या ची जाणीव ठेवत कामगार वरती होत असलेल्या अन्या विषयक माननीय राज्य मंत्री बच्चुभाऊ कडू, आमदार सुधीर मुनगंटीवार व विद्यमान पालक मंत्री राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी कामगारांचे हित जोपासत आज कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट वर्क्स या कारखान्यास भेट देऊन कंपनी व्यवस्थापन वतीने या ठिकाणचे मुख्याधिकारी एकरे, शाखाधिकारी शर्मा पाठक, कर्नल डे कामगारांच्या वतीने सुनील ढवस, दशरथ राऊत, पत्रकार प्रमोद वाघाडे, रवी बंडीवार यांच्या मध्यस्थीने केंद्र शासन व राज्य शासन यांनी वेळोवेळी जाहीर केलेले वाढीव वेतन त्वरित देण्याबाबत तसेच कंत्राटी पद्धतीने करत असलेल्या कामगाराला सेवाज्येष्ठतेनुसार स्थायी करून घेणे याशिवाय कंत्राटी पद्धतीने काम करत असलेल्या कामगाराला वैद्यकीय सेवा पुरवणे यासोबतच 21 मागण्यांचे प्रतिवेदन सादर करण्यात आले व कामगारांचे हित जोपासत मंत्री यांनी पंधरा दिवसात कामगारांच्या समस्या कोणत्याही परिस्थितीमध्ये दूर करून देऊ असे आश्वासन दिले.
आज याघडीला अल्ट्राटेक सिमेंट कंपनी मध्ये कामगारांचे हित जोपासणाऱ्या एल अँड टी कामगार संघटनेचे कंत्राटी कामगारांचा कोणताही संबंध नाही व त्यांची मध्यस्ती आम्ही खपवून घेणार नाही कंत्राटी कामगारांच्या हिताच्या प्रश्नाची चर्चा कामगार कंपनी व्यवस्थापनाशी आपल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून स्वतः करेल असे मत यावेळी कंत्राटी कामगारांची पुढारी सुनील ढवस यांनी व्यक्त केले!
कामगारांच्या विविध समस्या निकाली काढण्याच्या उद्देशाने आज कोणताही कंत्राटी कामगार आपल्या कर्तव्यावर न जाता नांदा फाटा येथील मुख्य चौकात सकाळी पाच वाजेपासून ठीय्या मांडून बसलेला दिसला येत्या पंधरा दिवसात समस्यांचे निराकरण न झाल्यास स्वतः पालक मंत्री हे कामगारांची बाजू घेऊन न्याय मागण्या पदरात पाडून घेतल्याशिवाय येणार नाही असे अस्वस्थ केल्यामुळे शेवटी कामगारांनी आपली बाजू नमते घेत आज पुकारलेल्या आंदोलनाचा पूर्णविराम करण्यात आला
मंत्र्यांच्या आगमनाची चाहूल लागता क्षणी नांदा फाटा व परिसराला संपूर्ण छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.