घुग्घूस | नगरपरिषद साठी सर्वपक्षीय अर्धनग्न व मुंढंन आंदोलन

0
486
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

इतरवेळी पुढे – पुढे करणारे मुंढनात बेपत्ता

घुग्घुस (चंद्रपूर) : नगरपरिषदेच्या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांतर्फे ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकण्यात आला
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 28 डिसेंम्बर रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आला व आज दिनांक 29 डिसेंम्बर रोजी ग्रामपंचायत कार्यलय परिसरात सर्वपक्षीय नेत्यांनी मुंढन आंदोलन पुकारले या आंदोलनात मागील काही दिवसात सर्वात पुढे – पुढे करणारे नेते मागे दढत असल्याचे निर्दशनास आले एका प्रमुख राजकीय पक्षाचा अध्यक्ष व युवामोरच्यांचा महामंत्री तर यावेळी चक्क बेपत्ताच होता यासोबतच इतर ही लोकप्रतिनिधी असलेले नेते या आंदोलना पासून लांबच असल्याचे दिसत आहे.
आजच्या मुंढन आंदोलना सोबत सर्वपक्षीय नेत्यांतर्फे अर्धनग्न आंदोलन ही करण्यात आले यावेळी काँग्रेसचे एस.सी.सेल जिल्हाध्यक्ष पवन आगदारी,किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, शिवसेनेचे गणेश शेंडे, यंग चांदा ब्रिगेडचे इम्रान खान, स्वप्ननील वाढई,राष्ट्रवादीचे श्रीनिवास गोस्कुला, सामाजिक कार्यकर्ते अशोक रामटेके, भरीपचे राजू वनकर, युवक काँग्रेसचे सुरज कन्नूर, माजी सरपंच संतोष नून, आदीने मुंडण केले.