
घुग्घुस : ग्रामपंचायतला नगरपरिषदचा दर्जा मिळाल्या नंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घुग्घुस शहराला आज सदिच्छा भेट दिली
तसेच घुग्घुसला नगरपरिषद निर्मिती करीता महाविकास आघाडीचे नेते तसेच मंत्र्यांनी विशेष परिश्रम घेतले अशी माहिती ही दिली.
प्रथम आगमन निमित घुग्घुस काँग्रेसचे अध्यक्ष राजूरेड्डी यांनी ना. जयंत पाटील साहेबांची सदिच्छा भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष श्रीनिवास गोस्कुला, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष दिलीप पित्तलवार व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.