त्या काँग्रेसच्या नेत्याच्या प्रकरणाशी माझा संबंध नाही : आमदार किशोर जोरगेवार

0
499

चंद्रपूर : येथील परिवहन कार्यालयाच्या निरीक्षकाकडून 40 हजार रुपयांची रोकड वसूल करणारे काँग्रेसचे नेते अशोक मत्ते यांना बुधवारी सायंकाळी जामिनावर सोडण्यात आले. पोलिस कारवाई टाळण्यासाठी अटकेनंतर मत्ते यांनी छातीत अस्वस्थता असल्याची तक्रार केली. त्यामुळे त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आणि सायंकाळी उशिरा त्याचा जामीन न्यायालयातून मंजूर झाला. मत्ते यांचेवर कारवाई टाळण्यासाठी काही लोकांनी माझेवर केलेले आरोप निराधार आहेत.

त्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले आहेक. मत्ते यांच्या अटकेसंदर्भात आमदार किशोर जोरगेवार म्हणतात की ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. त्याला सोडण्यासाठी मी पोलिस ठाण्यात जात असल्याची अफवा पसरवून काही दारूच्या तस्करांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. माझे कडून असे कोणतेही कृत्य झालेले नाही.

तर स्थानिक काँग्रेसे प्रवीण पाडवेकर यांनी सोशल मीडियावर आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर निशाणा साधून काँग्रेसची बदनामी करणा-यांना वाचविले जाणार नाही, असे म्हटले आहे.