BREAKING : चंद्रपूरातील चिपराळा शिवारात पट्टेदार वाघाचा मृत्यू

0
286

चंद्रपूर : जिल्‌हयातील भद्रावती वनपरिक्षेत्रांतर्गत ताडोबातील चिचपराळा शिवारात पट्टेदार वाघाचा मृत्यू झाल्याची घटना काल गुरूवारी (29 जानेवारी 2021) दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. दुपारच्या सुमारास वन कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना पट्टेदार वाघ कुजलेल्या व शाबूत अवस्थेत असल्याचे दिसून आला. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर वाघाच्या मृत्यूचे कारण पुढे येणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात ताडोबा अभयारण्य असून या ठिकाणी वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याच ताडोबा अभयारण्याला लागून असलेल्या भद्रावती वनपरिक्षेत्रांतर्गत चिपराळा वन कक्ष क्रमांक 210 मध्ये काल गुरूवारी दुपारच्या सुमारास वन कर्मचारी गस्तीवर असताना पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. वन कर्मचारी यांनी लगेच भद्रावतीचे वनपरिक्षेत्राधिकारी यांना याबाबत माहिती दिली. वरिष्ठानी तत्काळी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी जावून पाहणी केली. यावेळी पट्टेदार वाघ कुजलेल्या शाबूत मृतावस्थेत आढळून आला. मृतावस्थेत आढळलेला पट्टेदार वाघ हा नर जातीचा आहे.

त्याचे वय 13 वर्षे आहे. मृत वाघाचा एक दात तुटलेल्या अवस्थेत व उर्वरित तीन दात, मिश्या, नखे शाबून आहेत. वरिष्ठ वनाधिका-यांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाघाचे शवविच्छेदन केले. त्यानंतर वाघाचे दहन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतर वाघाच्या मृत्यूचे कारण कळणार आहे. मात्र वाघाचा मृत्यू वृध्दापकाळाने नैसर्गिकरित्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.