घुग्घुस : येथील प्रख्यात समाजसेवी राजूरेड्डी यांचा वाढदिवस व विविध रंगाची उदळन करणाऱ्या रंगपंचमी हा राष्ट्रीय सण एकाच दिवशी आल्याने मित्र परिवारा तर्फे रंगपंचमी व वाढदिवसाचा आनंद गरीब वस्तीतील चिमुकल्या सह साजरा करण्यात आला.
बँक ऑफ इंडिया वस्तीत वाढदिवस संपन्न
येथील लहान – लहान व गरजवंत मुलां सोबत रंगाची उदळन करण्यात आली चिमुकल्याच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. लहान मुलांना फळे बिस्कीट, चॉकलेट व अन्य खाण्याची पदार्थ देण्यात आले सदर आयोजन सचिन कोंडावार व नौशाद शेख,राकेश फुलझेले यांनी केले.
“अनाथ” मुलांच्या जीवनात भरले प्रेमाचे रंग
वांढरी फाटा येथील अनाथ बालकां सोबत होळी साजरी करण्यात आली कोरोना बचावासाठी मास्क वितरण करण्यात आले केक कापून वाढदिवस साजरा करण्यात मुलांना फराळ देण्यात आला व मुलांसाठी महिण्याभराचे संपूर्ण जीवनावश्यक वस्तूचे वितरण करण्यात आले.
सदर आयोजन विजय माटला यांच्या तर्फे करण्यात आला याप्रसंगी राजूरेड्डी, सैय्यद अनवर, तौफिक शेख, अजय उपाध्ये, सिनू गुडला, सचिन कोंडावार, किरण पुरेल्ली,बालकिशन कुलसंगे, नुरूल सिद्दीकी, रोशन दंतलवार, विशाल मादर,सुनील पाटील, व मित्र परिवार उपस्थित होते