चंद्रपूर : जिल्ह्यात दारूबंदीनंतर अनेक अवैध व्यवसायांना चांगलाच ऊत आला होता. मात्र, या अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना चांगलेच यश आले आहे. त्यामुळे गुन्हेगारी जगतात स्थानिक गुन्हे शाखेचीच दहशत आहे. पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी खुनाचे दोन गुन्हे उघडकीस आणले. चार आरोपींना अटक केली आहे. घरफोडीच्या १६ गुन्ह्यांत १ ९ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून एक कोटी १४ लाख ९९ हजार ६६१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. १२ चोरीचे गुन्हे उघड केले. यात २८ चोरट्यांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून एक कोटी १६ लाख ८० हजार ५४ ९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मोटारसायकल चोरीच्या १४ गुन्ह्यातून १५ चोरट्यांना ताब्यात घेऊन आठ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. फसवणुकीच्या एका गुन्ह्यात दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५१ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला. आर्म अॅक्ट कार्यच्या एका गुन्ह्यात चार हजार ५०० रुपये जप्त केले.
कारवायांत ८ विक्रेत्यांना अटक केली. त्यांच्याकडून २४ लाख ९९ हजार रुपयांचा माल जप्त केला. एनडीपीएस अॅक्टनुसार पाच कारवाया करीत दहा आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार लाख ९३ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस विभागाला हवे असलेले तीन आरोपींना अटक केली. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार ७२ कारवाया केल्या. यात ११६ विक्रेत्यांना अटक केली. त्यांच्याकडून तीन कोटी ८१ लाख ५७ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत ८ कारवायांत १८ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख ६० हजार ४०० रुपयांचे साहित्य, मुद्देमाल जप्त केले आहे.