चंद्रपूर : चिमुर तालुक्यातील चिमूर – कोलारा मार्गावरील मासळ येथे संशयखोर पतीने काठीने जबर मारहाण करून पत्नीला यमसदनी धाडल्याची थरारक घटना काल मंगळवारी (29जून)ला रात्री बाराच्या सुमारास घडली. विशाखा दीक्षित पाटिल (२९) असे मृत पत्नीचे नाव आहे तर दीक्षित हरीदास पाटील असे आरोपी पतीचे नाव आहे. पतीने दारूच्या नशेत तर्रर्र असताना पत्नीचा खुन केला आहे.
आरोपी पती दीक्षित हरीदास पाटील (३९) हा पत्नीवर नेहमी संशय घेत असे. त्यामुळे त्याचे पत्नी पत्नी विशाखा दीक्षित पाटिल (२९) हिचे सोबत नेहमीच भांडण होत असे. शसंशयाचे भूत त्याच्या मानगुटीवर बसले होते त्यातून पती पत्नी मध्ये घरगुती वाद-विवाद वाढले होते. घटनेच्या दिवशी ही कडाक्याचे भांडण झाले होते. रात्रीच्या सुमारास मोठ्या काठीने पतीने पत्नीला मारहाण केल्याने ती जागीच ठार झाली. मृतक विशाखा हिला 6 महिण्याची मुलगी आहे. आरोपी दीक्षित पाटील यांची ही तिसरी पत्नी असून या आधीही असाच हिंसाचार दोन्ही पत्नी सोबत करीत असल्याने माहेरी निघुन गेल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची साक्षीदार प्रिया पाटील यांचे तक्रारी वरुन पोलिसांनी आरोपी पती दीक्षित हरीदास पाटील याला अटक केली आहे. पुढील उपविभागीय पोलिस अधिकारी नितिन बगाटे यांचे मार्गदर्शनाखाली ए पीआय मंगेश मोहोड, पीएसआय गायकवाड,पोलिस निमगडे,गजभिये,गुट्टे, मडावी, खामनकर करीत आहेत.