चंद्रपूर जिल्ह्यात विज पडून दोघांचा मृत्यू

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• कोरपना तालुक्यात सोनूर्ली तर चंद्रपूर तालुक्यातील सोनेगाव येथील घटना
• जिल्ह्यात वादळीवा-यासह मुसळधार पाऊस

चंद्रपूर : आज जोरदार आलेल्या वादळी वाऱ्यास जिल्ह्यात दोन ठिकाणी वीज पडली. या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिली घटना कोरपना तालुक्यातील सोनुर्ली येथे तर दुसरी घटना चंद्रपूर तालुक्यातील सोनेगाव शेतशिवारात घडली आहे.

प्राप्त माहिती नुसार, कोरोना तालुक्यातील सोनुर्ली येथील पंढरी पडवेकर यांच्या पिपर्डा मार्गावरील शेतात मजूर कवडु मोहूर्ले (36)हा काम करायला गेला होता. सायंकाळी साडे चार वाजताच्या दरम्यान पावसाचा मौसम पाहून आपले काम आटोपून शेतमालकासह कवडु बैलबंडी घेवुन घराकडे परत निघाला. शेता बाहेर निघताच अचानक कवडु याच्यावर विज कोसळली यात कवडु मोहूर्ले ठार झाला. परंतु अन्य दोघे बैलबंडी वर बसलेल्या व्यक्ती ला कोणतीच इजा झाली नाही.
दूस-या घटनेत आज दुपारी 2:30 ते 3:00 वाजता दरम्यान घुग्घुस येथून जवळच असलेल्या सोनेगाव येथील शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला. दुपारी सोनेगाव येथील शेतकरी गोवर्धन किसन गोहणे हा नेहमी प्रमाणे आपले शेतीचे काम करण्यासाठी शेतात गेला होता परंतु दुपारी विजेच्या कडाक्यासह मुसळधार पाऊस पडला शेतात काम करीत असतानाच गोवर्धनच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

गडचांदूर कोरपना महामार्गावर वृक्ष कोलमडले वाहतुक ठप्प

गडचांदूर कोरपना या राष्ट्रीय महामार्गावर एक मोठे वृक्ष वारावादळी पावसात कोसळले. यात जिवीत हानी झाली नाही परंतु या मार्गावरील लोणी फाटा ते वनसडी व लोणी ते देवघाट नाला अशा दोन्ही बाजूची वाहतुक ठप्प पडली होती. कोरपना येथील पोलीस पथकाने व उपस्थित नागरिकांनी वृक्षाची एक फांदी तोडुन दुचाकी वाहना करीता खुला करुन देण्यात आला तर वृत्त लीहे पर्यंत हा मार्ग अवजड वाहना करीता खुला व्हायचा होता.