वेकोलि पैनगंगा कोळसा खाणीत पीसी मशीन खाली दबून ऑपरेटरचा मृत्यू

घुग्घुस (चंद्रपूर) : वेकोली वणी क्षेत्रातील पैनगंगा कोळसा खाणीत केपीएल या खाजगी कंपनीत कार्यरत मशीन ऑपरेटर दीपक पाटील यांचा मशीनच्या चैन खाली दबून दुर्दैवी म्रुत्यु झाल्याने वेकोली परिसरात खळबळ माजली आहे.

शुक्रवारी रात्री साडे नौ च्या सुमारास कोल फेस जवळ कार्य करीत असतांना ऑपरेटर दिपक पटेल वय 40 वर्ष ( मध्यप्रदेश ) हा टॉयलेट करिता मशीन उभी करून उतरला मशीन मध्ये कुणीच नसल्याने सुपरवायझर भाविक हा स्वतः मशीन मध्ये चडून काम करीत असतांना त्याला ऑपरेटर दीपक पटेल हा मशीनच्या चैन खाली आल्याचे लक्षात आले मात्र, तो पर्यंत दिपकचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच वेकोली अधिकारी व केपीएक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व पोलिसांना माहिती देण्यात आली. रात्री उशिरा पोलीस पंचनामा करून शव शवविच्छेदना करिता गडचांदूर येथे पाठविण्यात आले.

आज वेकोलीचे डिजीएमएस ची टीम पैनगंगा खाणीत घटनेची चौकशी करणार आहे.