महिलांचा सन्मान करणारा समाजच प्रगती करू शकतो

प्रविण सुर यांच्या कुटुंबियांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनिय योगदान : रविंद्र शिंदे

– माजरी येथे महिला बचत गट मेळावा

भद्रावती (चंद्रपूर) : प्रत्येक क्षेत्रात महिलांनी केलेले कार्य गौरवास्पद आहे. महिला शक्ती महान आहे. या शक्तीचा नेहमी आदर केला पाहीजे. त्यांना सन्मान मिळाला पाहिजे. महिलांचा सन्मान करणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. ही महत्वपूर्ण बाब सर्वानी लक्षात घेतली पाहीजे. भद्रावती तालुक्यातील माजरी हे गाव देशात मिनी इंडिया म्हणून ओळखल्या जाते. माजरी वस्तीत सर्वधर्मीय व विविध राज्यातून आलेले बंधू- भगिनी गुण्या गोविंदयाने राहतात. या गावातील सुर कुटूंबाने समाजात नेहमी एक आदर्श निर्माण केला आहे. प्रसंगी प्राणाची आहूती देण्याचे अविस्मरणीय कार्य या कुटूंबातील स्व.नंदुभाऊ सुरू यांनी केले आहे. याच कुटूंबातील यापूर्वी अमृताताई सुर यांनी जिल्हा परीषदेत महिला व बालकल्याण सभापती म्हणून फार चांगली कामगीरी केली. नंदुभाऊंनी घालून दिलेला सामाजिक बांधिलकीचा आदर्श त्यांचे बंधू प्रविणभाऊ सुर पुढे नेत आहे. त्यांच्या व्यक्तीमत्वातील विनयशीलता, समाजाप्रती असलेली धडपड आणि दुर दुष्टीकोन इतरांसाठी प्रेरणादायी ठरलेले आहे. यामुळेच प्रविण सुर यांच्या कुटूंबाचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रविंद्र शिंदे यांनी केले.

आज दि. २९ ऑक्टोंबर रोजी माजरीच्या माताराणी मंगल कार्यालयात आयोजित महिला बचत गट मेळावा व मार्गदर्शन सोहळ्याच्या उदघाटन प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना रविंद शिंदे पुढे म्हणाले की, स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रविंद शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून समाजातील निराधार, गरीब, होतकरू आणि सर्वसामान्य बंधू -भागिनींना मदत केल्या जात आहे. त्यांचे अश्रृ पुसणे , त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणे. हाच आमचा मानव सेवाधर्म आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटांना अधिकाधिक आर्थीक बळ देवून त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल असल्याचे रविंद्र शिंदे यावेळी म्हणाले.

इतर मान्यवरांनी सुध्दा समयोचित मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विविध आजाराच्या उपचारासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने माजरी ( कॉ. ) येथील निशा गुळगुंडे व मंगल घागरगुंडे तसेच डूकराच्या हल्ल्यात जखमी झालेले कावडी येथील रामभाऊ पारखी व सतिश तिखट यांना आर्थीक मदत देण्यात आली. तसेच स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॉरीटेबल ट्रस्टच्या वतीने कुचना येथील निराधार व आईवडील नसलेली लता एकनाथ मंगाम या मुलीला दत्तक घेण्यात आले. तसेच आजाराच्या उपचारासाठी माजरीचे बंडू झाडे व शेगाव ( खु. ) येथील देवांशी सालेकर यांना आर्थीक मदत देण्यात आली .
याप्रसंगी व्यासपिठावर कार्यक्रमाचे उदघाटक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रविंद्र शिंदे, अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश राजुरकर, जि.प. सदस्य प्रविण सुर, माजी जि.प. सभापती अमृता सुर, माजरी सरपंच छाया जंगम, कुचना सरपंच तेजस्विनी ताजने, टाकळी सरपंच संगिता देहारकर, सोनाली सुर, विभा सिंग, उषा कुडदुल्ला, संपदा वनकर, विद्या गुळगुंडे, सपना कुडदुल्ला,ताहीरा बानो सलील शेख, सारीका नगराळे व मंगला आत्राम उपास्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प. सदस्य प्रविण सुर, सुत्रसंचलन राकेश नक्षीणे व आभार प्रदर्शन अमोल अडवे यांनी केले. कार्यक्रमात महिला बचत गटाच्या पदाधिकारी व सदस्य फार मोठया संख्येत उपस्थित होत्या.