WCL सुभाष नगर कॉलोनी समस्याच्या विळखेत

0
336
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : येथील सुभाषनगर, गांधीनगर, रामनगर कॉलनीला निर्माण होवून आता 30 वर्ष झाले असून आजघडीला अनेक क्वार्टर हे जीर्ण अवस्थेत असून मरणासन्न अवस्थेत पोहचलेले आहे व धोकादायक झाले आहेत. त्यांना तात्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

क्वार्टर मधील सिवर पाईपलाइन ओव्हरफ्लो होत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.

यासोबतच शौचालय पाईप, दूषित पाणी व दुर्गंधीयुक्त गटारे, जंगली झाडे झुडपे अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढले असून यांचे मुळे नागरिकांच्या क्वार्टर मध्ये ही घुसलेले आहे. यामुळे ही नागरिकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असून या गंभीर प्रकरणात तातळीने लक्ष देऊन या मागण्या सोडवण्यासाठी नागरिकांनी सब एरिया मॅनेजर यांना सुरज कन्नुर जिल्हा उपाध्यक्ष, युवक काँग्रेस अध्यक्ष तौफिक शेख, निखिल पुनगंटी, सुनील पाटील, कासिम शेख, नितीन दुर्गम, रायसमलू जंगम, नरेश कोरकंटी, संजय मानकर निवेदन देऊन केली आहे.