युवक – युवतींचा शेकडोच्या संख्येत यंग चांदा ब्रिगेेडमध्ये प्रवेश

0
234
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
चंद्रपूर : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असलेल्या यंग चांदा ब्रिगेडकडे समाजसेवेची आवड असणा-या कार्यकर्त्यांचा कल वाढत चालला आहे. यातून संघटना बळकट होत असून संघटनेची ही ताकत सर्वसामान्यांच्या हितासाठी उपयोगी पडली पाहिजे. यंग चांदा ब्रिगेड ही सामाजिक कार्यकर्त्यांची संघटना असून यात काम करत असतांना समाजहितासाठी संघर्ष करण्याची तुमची तयारी असली पाहिजे असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
इंदिरा नगर येथील युवक – युवतींनी शेकडोच्या संख्येने यंग चांदा ब्रिगेडमध्ये प्रवेश केला. याकरीता इंदिरा नगर येथे प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडी शहर संघटीका वंदना हातगावकर, शहर संघटक कलाकार मल्लारप, विदयार्थी विभागाचे शहर प्रमूख अजय दुर्गे, विलास सोमलवार, राशेद हूसेन, आदिवासी विभागाच्या महिला शहर प्रमूख वैशाली मेश्राम, वैशाली काटकर, हरमन जोसेफ, राहूल मोहुर्ले यांच्यासह ईतर मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी आ. जोरगेवार पूढे म्हणाले कि, यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. या उपक्रमाचा लाभ शहराच्या शेवटच्या भागात असलेल्या इंदिरा नगर, संजय नगर येथील गरजूंपर्यंत  पोहविण्याचे काम आता इंदिरा नगर येथील यंग चांदा ब्रिगेडच्या शाखेच्या माध्यमातून झाले पाहिजे, या भागाकडे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. त्यामूळे अनेक समस्यांना येथील नागरिकांना तोंड दयावे लागत आहे. त्यामूळे विकास कामात मी या भागांना प्राथमिकता दिली असून येथील अनेक काम प्रगतिप्रथावर आहे. तर अनेक कामे प्रस्तावित आहे. विकास कामांबरोबरच येथील नागरिकांच्या अडचणी सोडविण्याच्या दिशेनेही माझे प्रयत्न सुरु आहे. आरोग्य, क्रिडा, आणि शैक्षणीक क्षेत्रात भरीव काम करण्याची माझी तयारी असून या दिशेने माझे नियोजन  सुरु आहे. गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक प्रभागात निशुल्क अभ्यासीका तयार व्हाव्यात ही आमची भुमीका आहे. इंदिरा नगर वासीयांनीही अभ्यासीकेसाठी एक प्रस्ताव दयावा असे आवाहण यावेळी त्यांनी केले. यंग चांदा ब्रिगेडमध्ये येथील युवकांनी इतक्या मोठ्या संख्येने प्रवेश केला ही आनंदाची बाब असून येथील यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या  माध्यमातून या प्रभागातील प्रश्न माझ्या प्रयत्न पोहचावेत अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. सेवा हा एकमात्र या संस्थेचा प्रमूख उद्दीष्ट असून कोणत्याही कार्यकर्त्याने  हे उद्दीष्ट बाजूला सारता कामा नये, असे आवाहणही त्यांनी यावेळी नवनियुक्त सदस्यांना केले. यावेळी बोलतांना यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर यांनी यंग चांदा ब्रिगेड विविध क्षेत्रात काम करत असून 450 हून अधिक महिलांच्या शाखा शहरात कार्यन्वत असल्याचे सांगीतले. मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यांनतर आमदार किशोर जोरगेवार यांनी संघटनेचा दूपट्टा टाकून नविन सदस्यांचे संघटनेत स्वागत केले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रविकांत टेर्भुकर, अक्षय बंसोड, रुपेश नाईक, मनिष चैधरी, गुड्डू बिसेन यांच्या नेतृत्वात हा प्रवेश घेण्यात आला.