स्क्वेयर पॉइंट बियर बार जवळ एकाची हत्या, तर दोन जखमी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

 रक्ताने पुन्हा हादरले बल्लारपूर शहर

चंद्रपूर : बल्लारपूर शहरात गॅंगवारी चे सत्र सुरुच आहे, सामान्य नागरीकांचे शहरात जगने कठीण झाले असुन,कायदा व सुवैवस्थेचा प्रशन निर्मान झाला आहे कारण कायदा कानून पोलीसांची भीति गुन्हेगारांना राहलीच नाही.

मिळालेल्या माहितीनुसार ३० ऑगस्टच्या रात्री ९.३० वाजता स्केअर पॉइंट बियर बारजवळ ३० वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली.

मृतक ३४ वर्षीय मिलिंद बोन्दाडे किल्ला वार्ड निवासी आहे. मृतांना वाचवण्यासाठी आलेल्या तरुणांवर हल्ला करण्यात आला, त्यात संघपाल कामडे आणि इतरांचा एकाचा समावेश आहे.