निवडणुक खर्च सादर न केल्याने उमेदवारीवर विरजण ; मनसे नेत्याला झटका

0
592
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

आवारपुर ग्रामपंचायतीवर काॅग्रेसचा झेंडा फडकणार

आवारपुर (चंद्रपूर) : मनसे नेत्याच्या पत्नीने मागील निवडणुकीचा खर्च सादर न केल्याने त्यांचा उमेदवारीचा अर्ज खारीज झाल्याने मनसेला जोरदार झटका बसला असून शेतकरी संघटनेचे मातब्बर नेते व माजी सरपंच यांच्याही पत्नीचा अर्ज मागील निवडणुकीचा खर्च सादर न केल्याने खारीज केला आहे तर संघटनेच्या प्रभाग ५ मधील उमेदवार शंकर पेन्देकर यांचाही अर्ज बाद झाला आहे यावेळेस बीजेपी व बीएसपी युती कडून प्रभाग ३ मधून निवडणूक लढविणारे निरजंने याचांही अर्ज बाद झाला आहे मनसे , बीजेपी , बीएसपी , शेतकरी संघटना यांचे अनेक उमेदवारी अर्ज बाद झाल्याने काॅग्रेस पक्षाच्या उमेदवारांना आयती संधी मिळाली आहे

खर्च सादर न करणे उमेदवाराला चांगली भारी पडले असून याचा फायदा काॅग्रेस पक्षाच्या उमेदवाराला होणार असून आवारपुर ग्रामपंचायतीवर काॅग्रेसचा झंडा फडकणार असल्याची चर्चा आहे

काॅग्रेस पक्षाकडून प्रभाग ५ मधून अनुसुचित जाती (स्त्री) राखीव प्रवर्गातून एकमेव उभी असलेली उच्च शिक्षीत इंजिनियर उमेदवार एकता केशव वानखेडे या निर्विरोध निवडणून येणार असल्याचे निश्चित एकता वानखेडेचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे