OBC महासंघाने केला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचा जाहीर निषेध

0
209
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : आज ३० डिसेंबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घोषणा पत्र जारी करून स्पर्धा परीक्षास बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न / संधीची संख्या मर्यादित करणे याबाबत निर्णय जाहीर केला असून त्यानुसार आयोगामार्फत आयोजित होणाऱ्या विभिन्न स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारास संधीची कमाल मर्यादा निश्चित करताना असे नमूद केले आहे की.
१) अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारास कमाल संधी मर्यादा लागू राहणार नाही.
२) इतर मागास प्रवर्गातील उमेदवारास कमाल ९ ( नऊ) संधी उपलब्ध राहतील.
ज्याप्रमाणे अनुसूचित जमातीस घटनेच्या ३४२ कलमाप्रमाणे व अनुसूचित जातीस घटनेच्या ३४१ कलमाप्रमाणे आरक्षण सोयी व सवलती देण्यात आलेल्या आहेत त्याच प्रमाणे ( ओबीसी ) इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांना घटनेच्या ३४० कलमानुसार आरक्षण देण्यात आलेले आहे.
घटनेच्या तरतुदीनुसार आरक्षण दिलेले असताना भेदभाव करणे उचित नाही त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेला निर्णय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय ( ओबीसी ) यांच्यामध्ये भेदभाव करणारा व दुफळी निर्माण करणारा आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेला निर्णय त्वरित रद्द करून ज्याप्रमाणे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना कमाल संधी मर्यादा लागू राहणार नाही त्याच प्रमाणे इतर मागासवर्ग प्रवर्गातील ( ओबीसी ) विद्यार्थ्यांना सुद्धा कमाल संधी मर्यादा लागू राहणार नाही अशी घोषणा त्वरित करण्यात यावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी विद्यार्थ्यांना रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागेल व या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राहील असे निवेदन देते वेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ अशोक जीवतोडे , महासचिव सचिन राजूरकर,जिल्हाध्यक्ष प्रा नितीन कुकडे,महासचिव प्रा विजय मालेकर, बबनराव फंड, बबनराव वानखेडे, डॉ संजय बरडे व इत्त्यादी पदाधीकारांनी उपस्थित होते