चंद्रपूर : जिल्ह्यातील औद्योगीक शहर म्हणून प्रसिध्द असलेल्या घुग्घुस ग्रामपंचायतला नगरपरिषदेचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी गेली 27 वर्ष घुग्घुस येथील विविध राजकीय पक्ष समाजिक संघटना व नागरिकांनी विविध स्वरूपाच्या आंदोलनाने शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
राज्यात महाविकास आघाडीचे सत्ता येताच पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी नियोजन भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत घुग्घुस नगरपरिषदेला हिरवी झेंडी दाखविली व लगेच 31 आगस्ट 2020 रोजी घुग्घुस नगरपरिषदेची प्रथम अधिसूचना शासकीय स्तरावर जाहीर करण्यात आली.
ऐन कोरोनाच्या काळात घुग्घुस वासीयांचे विकासा करीता आवश्यक असलेल्या नगरपरिषदेच्या मागणीला घेऊन सतत पाठपुरावा करीत जेम – तेम चार महिण्यात 31 डिसेंम्बर 2020 रोजी चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी घुग्घुस येथील जनतेला महाविकास आघाडी शासनातर्फे नववर्षाच्या पूर्वसंध्येला नगरपरिषदेची सप्रेम भेट देत असल्याचे जाहीर केलेले आहे.
व प्रशासक म्हणून चंद्रपूर तहसीलदार यांची नियुक्ती केलेली आहे. यामुळे घुग्घुस वासीयांचे ऐतिहासिक लढ्याला विजय वड्डेटीवारामुळे विजय प्राप्त झाला आहे.














