🔸 भाजपाने 339 ग्रा.पं.वर केला विजया दावा
🔹 80 टक्के ग्रा. पं. काँग्रेसच्या ताब्यात : पालकमंत्री विजय वड्डेटीवार
चंद्रपूूर : जिल्ह्यात शुक्रवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज सोमवारीला गाव कारभा-यांचे मशिनबंद असलेले नशिब उघडण्यात आले. या मध्ये जिल्हयातील 604 ग्राम पंचायतींपैकी 339 ग्राम पंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्व निर्विवाद निर्माण झाल्याचा दावा केला आहे तर तर जिल्हयाचे पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी 80 टक्के गा्रम पंचायतीं काँग्रेसच्या ताब्यात आल्याचा दावा केला आहे.
भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष आपापला पक्ष चंद्रपूरात नंबर असल्याचा दावा करीत आहेत.
राज्यानचे माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. मुनगंटीवार यांनी जिल्हीयात केलेल्याे विकासकामांचे हे यश असल्याचे सांगून भारतीय जनता पार्टीने जिल्हयातील पंधराही तालुक्यातील ग्राम पंचायतींवर विजयाची आकडेवारी जाहीर केली आहे.
भाजपाने तालुकानिहाय ग्राम पंचायतींवर दावा केल्यानुसार, चंद्रपूर तालुका 22, मुल 24, पोंभुर्णा 17, बल्लाारपूर 8, सावली 25 ,नागभीड 24 , चिमूर 60 , सिंदेवाही 24, राजुरा 14, कोरपना 7 , वरोरा 28, ब्रम्हवपूरी 33 ,भद्रावती 30 , गोंडपिपरी 23 ग्राम पंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्वी सिध्दी केल्याचा दावा केला आहे.
राज्याचे मद्त व पुनर्वसन, बहुजन कल्याण, आपत्ति व्यवस्थापन तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडिने ग्रामपंचायत निवडणुका लढविल्या. आज निवडणुकीचा निकाल हाती येताच जिल्ह्यात काँग्रेस व महाविकास आघाडीचे 80 टक्के उमेदवार विजयी झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. या प्रसंगी राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी, राज्यात महाविकास आघडीची सत्ता येवून एक वर्ष पूर्ण झाले. महाविकास आघाडीने वर्षभरात जनतेच्या हिताचे निर्णय घेवून काम केले. त्यामुळे राज्यातील जनतेनी काँग्रेसला महाविकास आघाडीच्या उमेदवाराना प्रचंड मतानी पसंती दर्शवून विजयी केले आहे. आज राज्यात काँग्रेस पक्ष एक नंबर वर विजयी झालेला असून चंद्रपुर जिल्हात 80 टक्के ग्रामपंचायतीवर कांग्रेस महाविकास आघाडीचा झेंडा फडकविल्याचा दावा पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी केला आहे.
जिल्ह्यात एकूण 639 ग्राम पंचायतींमध्ये निवडणुका पार पडल्या. त्यापैकी 22 बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. तर 3ा ग्राम पंचयायतींच्या निवडणूका विविध कारणांनी रद्द केलेल्या आहेत. उर्वरित 604 ग्राम पंचायतींमधील शुक्रवारी 11 हजार 364 उमेदवारांना इव्हीएम द्वारे मतदान करून त्यांचे भाग्य मशिनबंद केले होते. त्यापैकी आज निवडून द्यावयाच्या 4191 उमेदवारांचे भाग्य सोमवारी जिल्हाभरातील विविध मतदान मोजणी केंद्रावरून उघडण्यात आले. त्यामध्ये भाजप व काँग्रेस दोन्ही पक्षांनी आपण जिल्याडणत नंबर असल्याचा दावा केलेला आहे.