चंद्रपूर : जिल्ह्यातील सावली तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील आठ तरुणांची देश सेवेकरिता निवड करण्यात आली आहे. केंद्रीय सुरक्षा दलात आठ जणांची निवड झाली असून त्यांना देशाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे.
देशाची सेवा करण्यासाठी जे तरुण बी. एस. एफ. आणी सि.आर. पी. एफ मध्ये दाखल झाले आहेत त्यामध्ये बादल काशीनाथ खोब्रागडे (सावली), प्रफुल सुनील बोरकर (सावली), नितेश दिनेश वाढई (सावली), सुनील सोकाजी मेश्राम (कापसी), संजय आनंदराव डबले (बेलगांव), मयूर राजेश मशाखेत्री (मोखाळा), भास्कर नेताजी गावडे (पेंढरी मक्ता), प्रणय नत्थुजी निकोडे (पेंढरी मक्ता) यांचा समावेश आहे.
हे आठही तरुण अतिशय सामान्य घरामध्ये जन्म आहेत. त्यांना देशाची सेवा करण्यासाठी तळमळ होती. त्यामुळे त्यांनी नियमित अभ्यास करून देशसेवेत जाण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या सर्वांची परिस्थिती सामान्य, गरीबीची पण स्वतःला काहीतरी सिद्ध करायचं हे मनाशी बाळगले आणि त्या दिशेनं त्यांनी पाऊल टाकले. मिळेल ते काम करायचे आणि रोज मिळेल त्या वेळामध्ये आपला सराव व अभ्यास करायचा. शेवटी सर्वांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले.