अवैध दारू विक्री करणाऱ्या वर तातडीने कारवाई करा

0
48

कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत गृहमंत्री देशमुख यांचे निर्देश

चंद्रपूर : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही प्रचंड प्रमाणात अवैधरित्या दारुविक्री होत आहे. या बाबत जिल्ह्यात लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी विशेष लक्ष केंद्रीत तातडीने कारवाई करावी असे निर्देश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. कायदा व सुव्यवस्था संबंधात शुक्रवारी चंद्रपूर पोलीस मुख्यालयात आढावा बैठक पार पडली.

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, रस्ते महामार्ग पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, अतिरिक्त पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सागर डोमकर, उपअधिक्षक शेखर देशमुख तसेचसर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.

गृहमंत्री देशमुख यांनी, आढावा बैठक याप्रसंगी जिल्ह्यातील रेतीघाट लिलाव, कोविड नियंत्रण परिस्थिती, लसीकरण आणि जिल्ह्यात होत असलेल्या अवैध दारू विक्री बाबत माहिती घेतली. आढावा घेताना गृहमंत्र्यांनी अवैध दारु तस्करीकडे विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या.

तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत आरोग्य यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना केल्या.
प्रारंभी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी, सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा व त्यांच्या कामगिरीची माहिती दिली. खुन व खुनाचा प्रयत्न यासारखे गुन्ह्यात दोषसिद्धीमध्ये चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातून दुसरा असल्याचे तर सेशन व जे.एम.एफ.सी. कोर्ट दोषसिद्धीमध्ये सातवा असल्यसाचे त्यांनी सांगितले. तसेच पोलीस प्रशासनातर्फे महिला विरूद्ध गुन्हे तपासाकरिता एकूण नऊ पोक्सो गुन्हे तपास पथक गठीत केल्याचे व पोलीस सारथी उपक्रम व भरोसा सेल यासारखे उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here