तालुक्यातील 5 बार व 2 देशी दारु दुकानाचा समावेश
वणी (यवतमाळ) : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दारु दुकानावर गंडांतर आले होते. यामुळे वणी तालुक्यातील 5 बार व 2 देशी दारुची दुकाने बंद करण्यात आली होती. परंतु न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत कोणत्याही एका निकषाची पुर्तता करणाÚया अनुज्ञप्त्या कार्यान्वित करण्यास शासनाने मान्यता दिल्यामुळे दारु दुकानाच्या नुतनिकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य शासनाच्या गृह विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने बंद अनुज्ञप्त्यांचे नुतनिकरण करण्याबाबत उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांना निकषाबाबत अवगत केले आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार 1500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील अनुज्ञप्त्या, पर्यंटन विभागाने पर्यंटन जिल्हे म्हणुन घोषित केलेल्या नागपुर व औरंगाबाद जिल्हयातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रातील अनुज्ञप्त्या, राज्य शासनाने अधिसुचित केलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अनिनियम 1974 खालील क्षेत्र, महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम 2016 खालील प्राधिकरणे, महाराष्ट्र प्रादेशीक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 42 (ग) चे कलम (1) व (3) नुसार स्थापित नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणे, राज्यातील महानगरपालीका क्षेत्रापासुन व नगरपरिषद हददीपासुन 5 किमी आणि नगरपंचायत हददीपासुन 3 किमी क्षेत्रातील अनुज्ञप्त्यांचा समावेश करुन नुतनिकरणाबाबत आदेश देण्यात आला आहे.
शासन निर्णयानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दि. 3 डिसेंबरला राज्यातील सर्वच जिल्हाधिकाÚयांना सुचित केले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या दि. 15 डिसेंबर 2016, 31 मार्च 2017, 11 जुलै 2017 व 23 फेब्रुवारी 2018 ला देण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गा जवळील बंद असलेल्या अनुज्ञप्त्यांचे नुतनिकरणाबाबत निर्देश देत शासन निर्णयातील पुर्वीच्या निर्देशासह कोणत्याही निकषाची पुर्तता करणाÚया क्षेत्रातील अनुज्ञप्त्या कार्यान्वित करण्याबाबतचा आदेश देण्यात आला आहे. यामुळे वणी तालुक्यातील पाच बार व दोन देशी दारुची दुकाने सुरु होणार आहे.
शासन निर्णय व उत्पादन शुल्क विभागाचे आदेश धडकताच तालुक्यातील न्यायालयाच्या निर्णयामुळे बंद झालेली दारु दुकाने सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील चार वर्षा पासुन बंद दुकाने आता सुरु होणार असल्यामुळे दारु व्यवसायीकांत कमालीचा उत्साह निर्माण झाला आहे. येत्या मार्च महिन्या पुर्वीच अनुज्ञप्त्यांचे नुतनिकरण करण्याचा मानस सुध्दा काहींनी व्यक्त केला आहे.