महिलांनी सक्रियपणे राजकारणात उतरावे – राजुरेड्डी

0
223

हळद कुंकू कार्यक्रमात महिलांना केले प्रोत्साहित

घुग्घुस : साई बाबा बहुउद्देशीय संस्था पेंडरी मक्ता तथा लोकमत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने 31 जानेवारी रोजी टेम्पो क्लब घुग्घुस येथे हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी महिलां करीता उखाणा स्पर्धा घेण्यात आली.

घुग्घुस येथील महिलांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात भाग घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदाताई अल्लूरवार या होत्या प्रमुख अतिथी म्हणून वेकोलीचे मुख्य महाप्रबंधक उदय कावले यांच्या धर्मपत्नी सौ. सुवर्णा कावले,नम्रता ढेमस्कर महिला काँग्रेस प्रदेश सचिव,छाया प्रकाश देव, सुनीता धोटे, जासमीन शेख,दीप्ती सोनटक्के,प्रतिमा बुरचुंडे, सविता रंगारी, नंदिनी पाटील,

हे होते तर कार्यक्रमाचे आयोजन नंदा ताई अल्लूरवार, नेत्रा इंगुलवार, यांनी केले सूत्र संचालन आरती ताई आगलावे यांनी केले तर आभार प्रदर्शन जासमीन शेख यांनी केले. हा कार्यक्रम अत्यन्त आनंदमयी व उत्साही वातावरणात पार पडला या कार्यक्रमात घुग्घुस काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजुरेड्डी यांना प्रमुख अतिथी म्हणून पाचारण करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना राजुरेड्डी यांनी महिलांना राजकारणात 50% आरक्षण मिळालेले असून घुग्घुस नगरपरिषदची लवकरच निवडणूक होणार आहे.
या करिता सुशिक्षित व कर्तबगार महिलांनी निवडणूकी सह क्षेत्रात पुढाकार घ्यावा अशी ही विनंती केली.