चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विभागातील कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी ‘जनविकास’ चे ‘हल्ला बोल’ आंदोलन

0
26

चंद्रपूर : आधी कलम-कानून-कागद लेकर हल्लाबोल न्याय न मिळाल्यास ‘दंडा लेकर हल्लाबोल’ कामगारांसाठी ॲड. दिपक चटक एक रुपया शुल्क घेऊन कायदेशीर लढा देणार ॲड. नंदकिशोर नौकरकर व ॲड. ऋषीराज सोमानी निशुल्क मार्गदर्शन करणार

शासकीय विभागातील कंत्राटी कामगारांना नियमानुसार प्रमाणे किमान वेतन देण्यात येत नाही. किमान वेतनाची मागणी केल्यानंतर कामगारांना कामावरून काढण्यात येते.

लाखो रुपये पगार मिळणारे अधिकारी कंत्राटी कामगारांच्या पगारातून कमिशन घेतात.भ्रष्ट अधिकार्‍यांशी कंत्राटदारांचे साटेलोटे असल्याने रोजगार जाण्याच्या भीतीने कंत्राटी कामगारांना न्याय मागता येत नाही.किमान वेतन कायदा-1948,

पगाराचा कायदा-1936,कंत्राटी कामगार कायदा-1970, पिफ कायदा,घरभाडे भत्ता कायदा इत्यादी कामगार कायद्यांचे सरसकट उल्लंघन होत असतांना शासन-प्रशासन जाणीवपूर्वक बघ्याची भूमिका घेते.मुजोर व भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारी यांना वठणीवर आणण्यासाठी आता जनविकास कामगार संघातर्फे जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार आहे अशी माहिती जन्म विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी आज दिनांक 1 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डेरा आंदोलनाच्‍या मंडपामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.यासाठी आधी कायद्यामध्ये उपलब्ध असलेल्या तरतुदींचा वापर करून मानवधिकार आयोग,अनुसूचित जाती जमाती आयोग,महिला आयोग, पोलीस विभाग,भविष्य निर्वाह निधी विभाग, कामगार विभाग अशा विविध ठिकाणी तक्रारी करण्यात येतील. जिल्ह्यातील प्रत्येक विभागात कार्यरत कंत्राटी कामगारांसाठी कलम लेकर हलालाबोल, कानून लेकर हल्लाबोल,कागद लेकर हल्लाबोल आंदोलन करण्यात येईल.या आंदोलनासाठी एडवोकेट दिपक चटप प्रामुख्याने कंत्राटी कामगारांना सहकार्य करण्यासाठी नाममात्र एक रुपया शुल्क घेऊन कंत्राटी कामगारांसाठी कायदेशीर लढा देणार आहेत.तसेच ॲडव्होकेट नंदकिशोर नौकरकर व एडवोकेट ॠषिराज सोमानी सुद्धा या लढ्यामध्ये निशुल्क कायदेशीर मार्गदर्शन करणार आहेत
दिनांक 20 फेब्रुवारी रोजी अधिष्ठाता अरुण मुंडे यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका शिष्टमंडळाने डेरा आंदोलन वजन भेट देऊन जाहीरपणे दहा दिवसात कामगारांचे थकीत पगार जमा करण्याचे तोंडी आश्वासन दिले होते या आश्वासनाची मुदत उद्या दिनांक दोन मार्च रोजी संपत आहे उद्या पर्यंत होईल विद्या पाचशे कंत्राटी कामगारांच्या थकीत करतात त्यांच्या खात्यामध्ये जमा न झाल्यास वैद्यकीय महाविद्यालय पासून कोणत्या ठिकाणी जाण्यासाठी जिल्हास्तरीय हल्लाबोल आंदोलन याची सुरुवात करण्यात येईल अशी माहिती सुद्धा देशमुख यांनी यावेळी दिली.

अॅड.दिपक चटप प्रामुख्याने कंत्राटी कामगारांना सहकार्य करण्यासाठी नाममात्र एक रुपया शुल्क घेऊन कायदेशीर लढा देणार आहेत. तसेच ॲडव्होकेट नंदकिशोर नौकरकर व एडवोकेट ॠषिराज सोमानी सुद्धा या लढ्यामध्ये निशुल्क कायदेशीर मार्गदर्शन करणार आहेत.

दिनांक 20 फेब्रुवारी रोजी चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ.अरूण हुमणे यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका शिष्टमंडळाने डेरा आंदोलन भेट देऊन जाहीरपणे दहा दिवसात कामगारांचे थकीत पगार जमा करण्याचे तोंडी आश्वासन दिले होते.या आश्वासनाची मुदत उद्या दिनांक 2 मार्च रोजी संपत आहे.उद्या पर्यंत पाचशे कंत्राटी कामगारांचे थकीत पगार त्यांच्या खात्यामध्ये जमा न झाल्यास वैद्यकीय महाविद्यालया पासून जिल्हास्तरीय हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात करण्यात येईल अशी माहिती सुद्धा देशमुख यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here