दुर्गापूर येथील पिडिता व स्टंटबाजीत जखमी झालेल्यांची आमदार जोरगेवार यांनी घेतली भेट

0
322
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : दुर्गापूर येथे घडलेल्या घटनेतील पिढीतेच्या कुटुंबीयांची आज आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन भेट घेतली असून पिढीतेचा पूर्ण औषधोपचार रुग्णालयामार्फत नि:शुल्क करण्याच्या सुचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहे.

काही युवकांनी दुर्गापूर येथील १९ वर्षीय युवतीला निर्जनस्थळी नेत तीच्यावर अतिप्रसंग करुन तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी दुर्गापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेतील पिढीतेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. अद्यापही पिढीतेच्या प्रकृतीत पुर्णताह सुधारणा झालेली नाही. असे असतांनाही पिढेला रुग्णालयातून सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आज आमदार किशोर जोरगेवार यांनी रुग्णालयात जाऊन पिढीतेच्या कुटुंबीयांची भेट घेतली असून पिढीतेची प्रकृतीत पुर्णताह सूधारणा होई प्रयत्न तिचा रुग्णालयात उपचार करण्यात यावा तसेच पिढीतेला उपचारा दरम्याण लागणा-या औषधींचा पूरवठा रुग्णालयामार्फतच करण्यात यावा असे निर्देश दिले आहे.

दुचाकीच्या स्टंटबाजीत गंभिर जखमी झालेल्या गृहस्थाची आ. जोरगेवार यांनी घेतली भेट

स्टंटबाजांच्या स्टंटबाजीमूळे झालेल्या अपघातात हरदीप सहानी हे गृहस्थ जखमी झाले होते. त्यांच्यावर चंद्रपूरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्याण आज आमदार किशोर जोरगेवार यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या हरदीप सहानी यांची भेट घेतली. यावेळी स्टंटबाजीचा उच्छाद माजविणा-यांवर कार्यवाही करण्याचेही त्यांनी म्हटले आहे.