BREAKING : लाच घेताना होमगार्डला अटक, पोलिस फरार

0
683
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

◾ठाणेदाराला धक्का देऊन पोलीस फरार ; तपास सुरू

चंद्रपूर : गोंडपिपरी येथील मुख्य मार्गावरील गांधी चैकात आज मंगळवारी सायंकाळच्या सुमारास गडचिरोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच स्विकारतांना एका होमगार्डला रंगेहाथ पकडले.या घटनेतील मुख्य सुत्रधार असलेल्या पोलीसाला पकडले असता ठाणेदाराला धक्का देत तो घटनास्थळावरून पसार झाला. सध्या हा पोलीस फरार असून पथक त्याच्या मागावर आहे.

गोंडपिपरी येथील एक तरूण ट्रकचालक-मालक आहे.येथील पोलीस हवालदार देवेश कटरे याने तू दारूचा व्यवसाय करतो.तुझी ट्रक आमच्या मार्गाने चालते.एखादया वेळी तुझ्यावर कार्यवाही करणार.तुझे ट्रक ठाण्यात लावणार.जर हे करायचे नसेल तर मला दहा हजार रूपये दे अशी मागणी केली.सदर तरूणाला अशा स्वरूपात पैसे देण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे त्या तरूणाने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

त्यानुसार आज रात्री सात वाजताच्या सुमारास गोंडपिपरींच्या गांधी चैकात सापळा रचण्यात आला. पोलीस हवालदार देवेश कटरे याने आपल्या एका होमगार्ड असलेल्या सहकार्याला तरूणाकडून रक्कम स्विकारण्यास सांगितले.यावेळी रक्कम घेताच घटनास्थळी उपस्थित राहिलेल्या लाचलुचपत विभागाचे ठाणेदार यशवंत राऊत यांच्या पथकाने होमगार्डला रंगेहाथ पकडले. यावेळी हजर असलेल्या देवेश कटरे यालाही पकडण्यात आले.मात्र त्याने ठाणेदार राऊत यांना धक्का देत घटनास्थळावरून पळ काढला. राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पोलीस हवालदार देवेश कटरे हा फरार असून पोलीस पथकाकडून त्याचा शोध सुरू आहे.याच प्रकरणात पुन्हा एक पोलीस देखील फरार असल्याची माहिती समोर आली आहे.

आज गोंडपिपरीत आमच्या पथकाने कार्यवाही केली.या प्रकरणातील प्रमुख सुत्रधार पोलीस देवेश कटरे याने मला धक्का देत पळ काढला.तो सध्या फरार असून त्याचा शोध आम्ही घेत आहोत.
यशवंत राउत,
पोलिस निरीक्षक एसीबी,गडचिरोली.