जादूटोणा मारहाण प्रकरण : आरोपींना 4 सप्टेंबर पर्यन्त पोलीस कोठडी

चंद्रपूर : मिंडाळा (टोली) येथील जादूटोणा केल्याच्या संशयावरून मारहाण केलेल्या सर्व पाचही आरोपींना नागभीड येथील दिवाणी व फ़ौजदारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सध्या गावात शांतता असून मारहाण केलेल्या कुटूंबाच्या घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त आहे. सदर कुटुंब घाबरलेल्या अवस्थेत आहे.

गावात अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या वतीने लवकरच जनजागृती पर कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती गावचे सरपंच गणेश गड्डमवार यांनी सकाळ प्रतिनिधी शी बोलताना सांगितले तसेच आज पुन्हा नागभीड पोलीस स्टेशन चे ठाणेदार मडामे साहेब यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच गावकऱ्यांना अश्या कुप्रथेवर विश्वास नये असे संबोधित केले. सदर आरोपींची आमच्या घरातील पैसे जादूने गायब करते तसेच अशोक कामठे याने करणी केल्याने घरातील मुलीची तब्बेत बरी राहत नाही असा संशय बाळगून हल्ला केल्याची माहिती मिळाली.

सदर प्रतिनिधी गावात गेले असता गावकऱ्यांनी या घटनेबद्दल बोलण्यास नकार दिला. तसेच आरोपी हे फिर्यादी चा मुलगा अशोक कामठे याच्यशी दोन ते तीन दिवसांपासून वाद घालत होता अशी माहिती समोर आलेली आहे. या घटनेमुळे फिर्यादीचा मुलगा अशोक कामठे हा घाबरलेला असून तो सदर घटनेपासून घरी आलेला नाही तो कुठे आहे याची कुटुंबियांना सुद्धा माहिती नाही.. या घटनेत काठीने मारल्याच्या खुणा फिर्यादी इंदिराबाई कामठे यांनी दाखवल्या.

सदर घटनेबद्दल बोलतांना इंदिराबाई यांनी सांगितले की माझा मुलगा नेहमीप्रमाणे हा कामाला जातो म्हणून निघून गेला.. मात्र त्यांनतर दुपारी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान कोणाच्या तरी ओरडण्याचा जोरात आवाज आल्याने त्या आपल्या मुलीसह पाहायला निघाले असता आरोपीच्या घरासमोर त्यांच्या मुलाला पाण्याच्या टंकीच्या अँगल ला दोराने बांधून बँट व बांबूच्या काठीने मारहाण करताना दिसताच फिर्यादी इंदिराबाई व त्यांची मुलगी दोर सोडून मारहाण करण्यापासून अडवत असताना संपूर्ण आरोपी त्यांच्यावर तुटून पडले व लाथा बुक्क्यांनी तसेच बांबूच्या काठीने मारहाण केली.. सदर फिर्यादि व तिचे मुलगा मुलगी यांनी घटनस्थळावरून कसाबसा आपला जीव वाचवत पळ काढला..!!