घुग्घुस शहरातील प्रमुख रस्त्यावर स्ट्रीट लाईट (पथदिवे ) लावण्यात यावे

काँग्रेस तर्फे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

घुग्घुस : गेल्या 27 वर्षीच्या प्रदीर्घ कालावधी व संघर्षानंतर नगरपरिषद झाली असून आता शहराच्या सौंदर्यकरणा करिता तसेच प्रकाशा करीता शहरातील बाय पास रोड ते टेम्पो क्लब बंगाली कॅम्प,तिलकनगर ते बहादे – ले – आऊट, बहादे ले – आऊट ते बौद्ध समशान भूमी, बौद्ध समशान भूमी ते पंचशील चौक,मिरची मार्केट ते पंचशील चौक, पंचशील चौक ते पोळा मैदान,गांधी चौक ते बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया ते पोलीस स्टेशन, व अन्य प्रमुख मार्गावर स्ट्रीट लाईट पथदिवे लावण्यासाठी काँग्रेस शिष्टमंडळाने आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी नगरपरिषद मुख्य अधिकारी सौ. आर्शिया जुही यांना निवेदणातून केली आहे.

शिष्टमंडळात घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर,प्रफुल हिकरे, नुरुल सिद्दिकी, रोशन दंतलवार, इर्शाद कुरेशी,शुभम घोडके, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.