• चंद्रपुर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
• आरोपीकडून 11 लाखांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपूर : 20 मार्चला वरोरा तालुक्यातील टेभूर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 20 मार्च ला झालेल्या चोरी प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. देविदास रुपचंद कापगते, राजू वरभे, संकेत उके असे आरोपींचे नाव आहे. त्याचा या घटनेसोबतच विविध घटनांतील गुन्ह्यात सहभाग असून उत्तरप्रदेश राज्यातील ककराला गॅंग मधील सहा इसमांसोबत मिळून केला असल्याची कबुली दिली.
वरोरा तालुक्यातील टेभूर्डा येथे 20 मार्च च्या मध्यरात्री ला गॅस कटरच्या खिडकी तोडीत सहाय्याने बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये दरोडा टाकण्याच्या उदेश्याने प्रवेश केला. बँकेतील रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा एकूण 11 लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला.
डॉग स्कॉटच्या सहायाने आरोपींना शोधण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपी पसार झालेत. सदर घटनेतील आरोपींना पकडण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना सोपविण्यात आली होती. त्यांनी आरोपींच्या शोधासाठी पथके तयार करीत वेगवेगळ्या दिशेने तपासाला पाठविले. सन 2013 मध्ये या प्रकारची घटना माढेळी व तेलंगणा राज्यात घडली होती. गुन्ह्यातील आरोपींना वेगवेगळ्या राज्यातून अटक करण्यात आली होती. बँक ऑफ महाराष्ट्र व मागील गुन्ह्याच्या प्रकारात साम्य असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने त्याच दिशेने तपास सुरू केला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या रडावर असलेल्या आरोपींना 26 मार्चल अटक करण्यात आली. त्यामध्ये देविदास रुपचंद कापगते, राजू वरभे, संकेत उके यांचा समावेश आहे. सदर आरोपींनी उत्तरप्रदेशातील ककराला गॅंग मधील सहा इसमांसोबत मिळून घटना केल्याची कबुली दिली आहे. सदरील प्रकरणातील मुख्य आरोपी बदायु येथील रहिवासी नवाबउल हसन याला ताब्यात घेण्यासाठी सपोनि बोबडे व संदीप कापडे हे आपल्या चमुसह बदायुकडे रवाना झाले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने ऑपरेशन ककराला सुरुवात केली, स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींच्या हालचालीवर लक्ष केंद्रित करीत माहिती गोळा करण्यात आली होती, 31 मार्चला मुख्य आरोपी नवाब उल हसन हा हसनपूर येथे साथीदाराला भेटण्याकरिता येणार असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. या कारवाईत आरोपिसोबत पोलिसांची झटापट झाली. त्यामध्ये जितेंद्र बोबडे व संदीप कापडे यांना किरकोळ दुखापत सुद्धा झाल्याची माहिती आहे. त्यांनी 2 आरोपींना अटक करण्यात आली.
दोन्ही आरोपींना बदायु जिल्ह्यातील आलापूर पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्यांनी उत्तरप्रदेश येथील 6, चंद्रपूर जिल्ह्यात दोन आणि गोंदिया जिल्ह्यातील 1 आरोपीचा सहभाग असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. आरोपी नवाब उल हसन यांच्या घराची चौकशी केली असता त्यांच्या घरातून तब्बल 1 कोटी 7 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींना वरोरा पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर पुन्हा चौकशी केली असता त्यांनी महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात एकूण 11 गुन्ह्याची कबुली दिली आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचया चमूने केली आहे.