• कंपनी कामगारांचा कॅम्प केला सील
• सर्व कामगारांची होणार कोरोना चाचणी
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील गडेगाव -विरुर येथील एएसडीसी ह्या खाजगी कंपनीतील आज शनिवारी तपासणी केलेल्या 125 पैकी 14 कामगार कोरोना बाधित निघाल्याने कामगारी निवास करीत असलेल्या कॅम्पला सील करण्यात आले आहे. ह्या चौदाही कामगारांना येथे सरकारी रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. हे सर्व कामगार वकोलीच्या पैनगंगा खाणीत काम करताना. वेकोली खाणीतही कारोनाने एन्ट्री केली असल्याने भविष्या या ठिकाणी विविध निर्बंध लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पैनगंगा वेकोली कोळसा खाणीत एएसडीसी ह्या खाजगी कंपनीतर्फे कामगार वेगवेगळ्या क्षेत्रात कामगार पुरविले जावून काम केले जाते. ह्या कामगारांचा कॅम्प गडेगाव विरूर येथे कार्यरत आहे. ह्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील 225 कामगार कार्यरत आहेत. जिल्हा प्रशासनाने सर्व शासकीय खाजगी आस्थापनांमध्ये कोरोना चाचणी करण्याकरिता शासकीय कॅम्प लावून तपासणीचे काम युध्दपातळीवर घेतले आहे. ह्यामध्ये वेकोली कोळसा खाणीमध्ये कार्यरत कामगारांचेही चाचणी करण्यात येत आहे. आज शनिवारी (3 एप्रिल 2021) एएसडीसी या कंपनीमध्ये कार्यरत कामगारांची तपासणी करण्यासाठी कॅम्प लावण्यात आला. यामध्ये आज दिवसभरात 125 कामगारांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 14 कामगारा कारोना बाधित निघाले आहेत. त्यांना तातडीने राजुरा येथील सरकारी रूग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले आहे.
आज चौदा कामगार बाधित निघाल्याने जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार एएसडीसी कॅम्पला सील करण्यात आले आहे. उद्या रविवारी ही चाचणी होणार नाही मात्र सोमवारी परत उर्वरित कामगारांची चाचणी करण्यात येणार आहे. त्यांनतर कॅम्पमध्ये कार्यरत कामगारांना वेकोली कोळसा खाणीत काम करण्याबाबत निर्णय होणार असल्याचे अधिकृत सुत्रांकडून समजते.
सदर कंपनीतील व्यवस्थापन कर्मचारी हे मूळचे यूपी, बिहार, बंगाल, एम्पी आदी पर राज्यातील आहेत. कंपनीमध्ये कार्यरत कामगारांचे बाहेर राज्यात किंवा क्षेत्रीय ठिकाणी जाणे येणे सुरूच असते. सध्या चंद्रपूरात दरदिवसी येणारा कोरोना बाधितांचा आकडा आठवडाभरात अचानक वाढला आहे. त्यांनतर कामागरांची तपासणी होत नव्हती.
जिल्हा प्रशासनाने सर्वच आस्थापनामध्ये तपासणीचा निर्णय घेतल्याने त्या ठिकाणी कॅम्प लावण्यात येत आहेत. एएसडीसी मध्ये चौदा कामगार बाधित निघाल्याने वेकोली प्रशासनाची चिंता वाढली आहे. एकट्या हया कंपनीचे पुन्हा शंभर कर्मचारी यांची तपासणी होणार असून त्यामध्ये किती बाधित आकडा पुढे येतो याकडे वकेाली प्रशासनाचे लक्ष लागले आहे. आता कंपनीमध्ये मास्कचा वापर, वारंवार हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर करण्यावर वेकोली प्रशासनाला भर द्यावे लागणार आहे.