सात वर्षांपासून शासकीय इमारतीचा कराटे शिकवणी साठी अवैध वापर ?

नगरपरिषद प्रशासकाने इमारत केली सील

घुग्घुस : येथील तुकडोजी नगर वॉर्ड क्रं .सहा येथे वर्ष 2014 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागा तर्फे ग्रामपंचायत सभागृहाचे निर्माण करण्यात आले होते.
सदर इमारतीचे हस्तांतरण देखील झाले नसतांना भाजप शहर अध्यक्षांचे भाऊ हे सदर इमारतीचे वापर व्यवसायिक कराटे शिकवणी वर्गा करिता मागील अनेक वर्षांपासून अवैध वापर करीत होते.

ही शासकीय इमारत आधुनिक सोयी – सुविधा युक्त असून या इमारतीत अनेक एसी देखील लागलेले आहेत.
याला येणारा प्रचंड विजेचा बिलाचा भरणा हे सर्व साधारण नागरिकांच्या करा मधून करण्यात येत होता.

या इमारतीचा उपयोग परिसरातील नागरिकाना होत नसल्याने नागरिकांत प्रचंड आक्रोश निर्माण झाले होते याची दखल घेत किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोशन पचारे यांनी पाच जुलै रोजी सदर इमारत नगर परिषदच्या अखत्यारीत देण्यात यावी अशी तक्रार केली होती. कारवाई न झाल्यास लोटांगण आंदोलनाचा इशारा दिला होता.

त्याची दखल घेत आज दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास नगरपरिषदचे प्रशासक निलेश प्रकाश गौड यांच्या आदेशानुसार नगरपरिषदे तर्फे सदर इमारत सील करण्यात आली असून येणाऱ्या काळात सदर इमारतीचा वापर नगरपरिषदेच्या कार्यासाठी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक गौड यांनी दिली आहे.

घुग्घुस येथील अनेक इमारती या शासकीय निधींतून निर्माण झालेल्या असून त्यांचा खाजगी व राजकीय वापर होत असल्याने या इमारतीवर कधी कारवाई होते याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहेत.