घुग्घुस परिसरात वाघाचा धुमाकूळ

0
605

बातमी साठी गेलेल्या पत्रकाराला वाघाचे दर्शन

घुग्घुस : मागील दोन दिवसांपूर्वी लगतच्या नकोडा गावातील राममंदीर परिसरात वाघ दिसल्याचे नागरिकांत चर्चा होती. वन विभागाने त्याठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून वाघाची शोध मोहीम राबविली असता आज सकाळी घुग्घुसचे एक पत्रकार बातमी साठी वर्धा नदीच्या घाटा कडे गेले असता त्यांना वाघाचे दर्शन झाले त्यांनी आपल्या मोबाईलने वाघाची रेकॉर्डिंग केली आहे.

यामुळे परत एकदा घुग्घुस परिसरात वाघांची दहशत पसरली आहे. यापूर्वी शास्त्री नगर निवासी गोपालक कोंडय्या तलारी यांच्या म्हैशीचे वाघाने निलजय कोळसा खाणी परिसरात शिकार केली.

यामुळे वेकोली कर्मचाऱ्या सह गोपालकां मध्ये ही दहशतीचे वातावरण आहे.