भागरथाबाईचा निवारा घेतोय राजूच्या आधाराने आकार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• काही दिवसांपूर्वीच शॉर्ट सर्किटने जळाले होते घर

चंद्रपूर : अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या गरजा पूर्ण व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपापल्या मिळकतीप्रमाणे त्या पूर्ण करण्याचा प्रयत्नही असतो. गर्भ श्रीमंताच्या गरजा सोडल्या तर गरींबांसाठी ह्या गरजा पूर्ण करणे जिकरीचे ठरते. पानावर आणून हातावर खाण्यासाठीच अख्ये आयुष्य खर्ची होते. मग निवाऱ्याचा प्रश्न हा आयुष्याच्या शेवट पर्यंत सुटत नाही. त्यांना आज होईल उद्या पूर्ण होईल अशा स्वप्नातच निवाऱ्याचा आनंद घेता येतो. काही व्यक्ती अजूनही सामाजिक बांधिलकी जपत लोकांना मदत करतात. मग कुणी पैशाची असो की वस्तुंची.

मात्र घुग्घूस येथे शार्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत भागरथाबाईचे घर जळून खाक झाले. तिच्या डोक्यावरील छत गेल्याने तीला उघड्यावर राहावे लागले. ती आयुष्याच्या शेवट पर्यंत आपली निवाऱ्याची गरज पूर्ण करू शकणार नाही. आणि यंत्रणा आवश्यक त्यावेळी तिला निवारा उपलब्ध करून देवू शकणार नाही. त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून राजकारणातील एका भल्या माणसाच्या आधाराने भागरथाबाईचा निवारा आता आकार घेऊ लागला आहे.

घुग्घूस येथील अमराई वॉर्डातील वयोवृद्ध भागरथाबाई सिडाम ह्या निवासी. परंतु काही दिवसांपूर्वी या महिलेचे घर शॉर्ट सर्किटमुळे जळाले. यात डोक्यावरील छत पूर्णत: जळून खाक झाले. संसारोपयोगी साहित्य जळाले. संसाराचा गाडा एका घटनेने विस्कळीत झाला. त्यामळे त्या ती माऊली उघड्यावर राहण्याची वेळ आली. घर अतिक्रमणात असल्याने भागरताबाई कुठल्याही प्रकारची शासकीय मदद मिळू शकली नाही. आयुष्य जगताना ही वयोवृद्ध महिला हतबल ठरली होती. काही स्थानिक लोकांनी थोड्याफार मदतीसाठी हात पुढे केला. काही युवकांनी अन्न धान्य देऊन त्या महिलेला मदत केली. परंतु आयुष्याच्या निवाऱ्याचा मुख्य प्रश्न भागरथाबाईला चिंतेत टाकणारा होता. उघड्यावर कसे राहायचे, कधीपर्यंत राहायचे असे अनेक प्रश्न त्यांना भेडसावत होते. भागरथाबाईची निवाऱ्याची धडपड घुग्घूस येथील काँग्रेसचे अध्यक्ष राजु रेड्डी यांच्या कानावर पडली. सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी त्या महिलेला मदत करायची असा निश्चय केला. त्यांनी भेट घेऊन भागरथाबाईच्या स्वप्नातील घराला आकार देण्याचे शब्द त्या महिलेला दिला.

भागरथाबाईच्या निवाऱ्याला त्याच जागी आकार देण्यास सुरूवात झालेली आहे. बांधकामाला सुरूवात होवून निवारा आकारला जातोय. निवारा जसा जसा आकार घेतोय भागरथाबाईच्या चेहऱ्यांवरील हास्य जीवन जगण्याला बळ देत आहे. येत्या आठवडाभरात निवाऱ्याचे बांधकाम पूर्णत्वास जाणार आहे. कायमस्वरूपी घराची इच्छा त्यांची पूर्ण होणार आहे. आयुष्याला शेवटच्या क्षणीची इच्छा पूर्णत्वास जात असल्याने भागरथाबाईच्या चेहऱ्यावरील समाधान झळकताना दिसते आहे.
सामाजिक बांधिलकीने भागरथाबाईच्या घरासाठी राजू रेड्डी यांच्या हातून घडलेले कार्य त्यांनाही समाधान देणारे ठरणार आहे.