ताडोबातील वाघांचा मी मोठा फॅन : सचिन तेंदुलकर

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

◆वाघाच्या शोधात सचिनची ताडोबात जंगल सफारी
◆मदनापूर,अलिझंझा क्षेत्रात वाघाचे दर्शन नाही

चंद्रपूर : आमचे लाखों चाहते क्रिकेट प्रेमी फॅन आहेत , मात्र मी ताडोबातील वाघांचा मोठा फॅन आहे. त्यामुळेच वारंवार व्याघ्र पर्यटनासाठी ताडोबात मुक्कामी येतो आणि वाघांचे दर्शन घेतो. हा माझा खासगी दौरा असल्याने आम्हाला थोडी मोकळीक द्या. ताडोबा अंधारी व्याघ्र पर्यटनासाठी खुप चांगले ठिकाण असल्याचे खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंदुलकर यांनी काही पत्रकारांशी बोलताना मान्य केले. ताडोबात चार दिवसाच्या मुक्कामी असलेल्या बांबू रिसोर्ट मधुन ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील शिरखळा बफर क्षेत्रात सफारी करीता आज रविवारी सायंकाळी ४.१५ मिनिटाने घाई घाईने निघात असतांना संवाद साधला.

क्रिकेटर सचिन तेंदुलकर याने ताडोबा मध्ये २६ जानेवारी २०२० ला पत्नी अंजली, मुलगा अर्जुन यांचेसह जंगल सफारी केली.२६ जानेवारी २०२१ च्या दरम्यान आई आणी मित्रांसोबत सफारी करून ताडोबातील जैव विविधतेचे तथा जवळपास १२ वाघांचे दर्शन घेतले.यावेळेस पुन्हा काल शनिवारी पत्नी अंजली,बहिन,क्रिकेटर प्रशांत वैद्य व मित्रा सोबत पुन्हा ताडोबातील वाघांच्या दर्शना करीता आला. पावसाळ्याचे दिवस असल्याने कोअर क्षेत्रात जंगल सफारी बंद आहे. काल शनिवारी सायंकाळी ताडोबाच्या मदनापुर बफर क्षेत्रात ४.३० पासुन तर ७.३० पर्यंत जंगल सफारी केली मात्र वाघांचे दर्शन झाले नाही. यावेळेस त्यांचे सोबत वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी लिमये आणी गुरुप्रसाद सुद्धा उपस्थित होते.
काल सांयकाळच्या जंगल सफारीमध्ये वाघ दिसला नाही त्यामूळे आज रविवारला सकाळी ७.०० वाजता ताडोबाच्या अलिझंझा बफर क्षेत्रात ११.३० वाजेपर्यंत जंगल सफारी केली.

याही दरम्यान वाघाचे दर्शन झाले नाही. शिरखळा बफर क्षेत्रात वाघ असल्याचे माहिती मिळाल्यावरून आज रविवारी पुन्हा सांयकाळी ४.१५ ला बांबू रिसोर्ट वरून सफारी करीता पत्नी, बहिन ,माजी क्रिकेटर प्रशांत वैद्य आणी मित्रा सोबत शिरखळा बफर झोनमध्ये सफारी केली. यावेळी सचिन तेंदुलकर यांचेशी काही पत्रकारांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आमचा खाजगी दौरा असल्याने सांगून ताडोबा ही खुप चांगली पर्यटनासाठी जागा असल्यानचे सांगून मी ताडोबातील वाघांचा फॅन असल्याने वारंवार येतो हे सांगण्यास तो विसरला नाही.