वीजबिल तालाठोको आंदोलन ; भाजप जिल्हाध्यक्षा सह 34 वर गुन्हे दाखल

0
408
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस (चंद्रपूर) : कोरोना काळातील नागरिकांना पाठविण्यात आलेले भरमसाठ वीज बिल परत घेण्यात यावे या करीता भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली 5 फरवरी रोजी महाविकास आघाडी सरकार विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला.
आघाडी सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. यानंतर महावितरण कार्यलयाला कुलूप ठोकण्यात आले.

प्रेतयात्रेचे अंतीमसंस्कार व दहन करण्या संदर्भात पोलीस व आंदोलन कर्त्या मध्ये गांधी चौक येथे तणावाची परिस्थिती ही निर्माण झाली होती.
मात्र पोलिसांना न जुमानता आंदोलकांनी पुतळा दहन केले. घुग्घुस पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

घुग्घुस पोलीस स्टेशन मध्ये भांदवी 143, 149,188, 279,270,186 व मुंबई पोलीस कायद्यानुसार 135 नुसार प्रमुख नेत्या सह 35 भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्यात आलेले आहे.