घरगुती वादातून प्रियसी पत्नीला जबर मारहाण; उपचाादरम्यान पत्नीचा मृत्यू

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

किन्ही गावातील घटना; फिर्यादी पोलीस पाटलाच्या तक्रारीवरून पती’ला चौकशीसाठी ताब्यात

चंद्रपूर : दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. त्यातच सात जन्माच्या गाटी बाधल्या मात्र, त्या फार काळ टिकू शकल्या नाही. अल्प काळातच सुखी संसारात मिठाचा खडा पडला. दोघांमध्येही वाद वाढला. आणि हा वाद जीव जाण्याईतपत विकोपाला गेला.

घरघुती वादातून मनोज सुरेश कंन्नाके याने गुरवार २ तारखे’ला रात्री ११.३० च्या सुमारास पत्नी सुषमा कंन्नाके हिला जबर मारहाण केली होती.

मात्र, उपचाादरम्यान काल रात्री तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतक पत्नी सुषमा मनोज कंन्नाके वय- २३ आणि आरोपी मनोज सुरेश कंन्नाके वय- २५ रा. दोघेही किन्ही या पती आणि पत्नीचे या दोघांचेही शुल्लक कारणावरून एकमेकाशी वाद व्हायचे. आणि या वादात पती मनोज सुरेश कंन्नाके हा पत्नी सुषमा हिला मारहाण करायचा. दि.२ तारखेला गुरवार रात्री ११.३० च्या सुमारास भांडण झाले. या भांडणात पती मनोज कंन्नाके यांनी पत्नी सुषमा मारहाण केली. तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते.

मात्र, उपचाादरम्यान काल रात्री १०.३० ला तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अल्प काळात या दोन प्रेमविवाहचा अंत झाल्याने किन्ही गावात काल मध्यात्री पासून स्मशान पसरली आहे. फिर्यादी पोलीस पाटील अरुण नागोबा बुच्चे यांच्या तक्रारीरून पती मनोज कंन्नाके याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेझ मुलांनी करीत आहे.