त्या महिलेचे दोन दिवसानंतर प्रेत मिळाले

चंद्रपूर : घुग्घूस -वणी मार्गावरील वर्धा नदीच्या बेलोरा पुलावरून शनिवारला दुपारी 3.30 वाजता दरम्यान वर्धा नदीत एका अज्ञात महिलेने उडी घेतल्याची माहिती या मार्गावरून जाणाऱ्या काही नागरिकांनी घुग्गूस पोलिसांना दिली.पोलिसांनी चंद्रपूर येथून रविवार दिनांक 5 सप्टेंबरला बचाव पथक बोलावून सकाळी 8 वाजता पासुन सायंकाळी 5 वाजेपर्यंत बचाव मोहीम राबविली परंतु प्रेत मिळाले नाही.

यामुळे सोमवारला पुन्हा सकाळी 8 वाजता पासुन बचाव मोहीम राबविली असता दुपारी 2.15 वाजता दरम्यान वर्धा नदीच्या नायगाव घाटाजवळ अज्ञात महिलेचे प्रेत आढळून आले. त्या महिलेची पोलिसांनी ओळख पटविली असता सौ.रविता मंगल जुनगरी रा.बहिरम बाबा नगर वॉर्ड क्र.6 घुग्गूस असे असल्याचे सांगितले.ही महिला शनिवाला दुपारी 3 वाजता दरम्यान घरून निघून गेल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली होती.

त्याच महिलेचे प्रेत आढळून आले.ही मोहीम ठाणेदार राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली घुग्गूस पोलीस ठाण्याचे एपिआय मेघा गोखरे,येनमूलवार, महेंद्र वन्नकवार, रंजित भुरसे, किशोर रिंगोले,रंजना नैताम ,व चंद्रपूर बचाव पथकाचे बोट चालक अशोक गर्गेलवार, वामन नक्षीने, दिलीप चव्हाण, उमेश बनकर, मंगेश मते, सुजित मोगरे, गिरीश मरापे, रुपेश निरस्कर व अजित बाहे यांनी बोटीच्या सह्याने शोध मोहीम राबविली.पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.