ताडोबात सचिनने पूजले सर्जा राजाला

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

◆ तुकूमच्या दोन शेतक-यांना टाॅवेल आणि एकशे एक रूपयाची भेट
◆ तिस-याही दिवशी सचिनला वाघाचे दर्शन नाही

चंद्रपूर : लाखों चाहत्यांचा फॅन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर हा चार दिवसाच्या व्याघ्र पर्यटनासाठी ताडोबात मुक्कामी आहे. आज सोमवारी शेतकऱ्याचा दरवर्षी साजरा होणारा बैल पोळा सणाच्या निमित्ताने सचिनने ताडोबातच “सर्जा राजा” ची पूजा केली आहे. बैलजोडी घेवून आलेल्या दोन शेतकऱ्यांना टॉवेल आणि एकशे एक रुपयाची भेट देऊन शेतकऱ्यांप्रती असलेली आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे.

आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था ही कृषीवर आधारीत आहे तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्यामुळेच शेतक-यांचा दरवर्षी पोळा हा सण उत्साहात साजरा केला जातो. परंतु मागील वर्षी पासून कोविडच्या आजाराने शेतकरी हा घरीच साध्यापणाने पोळा सण साजरा करीत आहेत. यावेळीही शासनाने आवाहन केल्यानंतर गावातील तोरणात नेवून साजरा होणारा पोळा सण आज सोमवारी शेतकरी घरीच पूजाअर्चा करून साजरा करीत आहेत. मात्र या वेळेसचा ताडोबात साजरा झालेला बैलपोळा सन हा आठवणीत राहणारा असाच आहे. कारण त्याचे कारणही खास असेच आहे.
जागतीक पातळीवर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी खुप चांगले ठिकाण असल्याचे खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंदुलकर हा चार दिवसाच्या ताडोबा मुक्कामी खासगी बांबू रिसोर्ट मध्ये आपल्या कुटूंबीयासह थांबलेला आहे. शनिवारी ताडोबात आल्यानंतर त्यांनी तिन्ही दिवस वाघांच्या दर्शनासाठी जंगल सफारी केली , परंतु या कालावधीत अद्याप व्याघ्र दर्शन झालेले नाही.

पत्नी अंजली,बहिन,क्रिकेटर प्रशांत वैद्य व मित्र यावेळी सचिन याचेसोबतीला असून उद्या त्यांचा पर्यटनाचा शेवटचा दिवस आहे. सकाळी जंगल सफारी नंतर दूपारी ते परतणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र यावेळी सचिन यांचा बैल पोळा सण हा ताडोबातच साजरा झालेला आहे. ताडोबातीलच बांबू रिसॉर्ट पासून अर्धा किमी अंतरावरील तुकूम या गावातील दोन शेतकरी तेजराम खिरडकर व विनोद निखाडे यांनी बांबू रिसॉर्ट मध्ये घेऊन आलेत. त्या ठिकाणी सचिन तेंडुलकर आणि त्याच्या कुटुंबीयांनी शेतक-यांची आण बाण शान असलेल्या सर्जा राजाची पूजा अर्चा केली. बैलजोडीचे दर्शन घेतले. दोन्ही शेत-यांना सचिन यांनी टाॅवेल आणि एकशे एक रूपयाची भेट देण्यात आली.
कोविड काळात अगदी साध्या पध्दतीने शेतक-यांप्रती आपली आस्था व्यक्त केल्याने ताडोबातील पोळा सण हा त्या दोन्ही शेतक-यांना आणि सचिनसाठीही अविस्मरणीय ठरलेला आहे.