
घुग्घुस : ग्रामपंचायतला नगरपरिषदेचा दर्जा मिळाल्यानंतर तहसीलदार निलेश गौड यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आज दिनांक 07 जानेवारी 2021रोजी घुग्घुस ग्रामपंचायत येथे अधिकृत रित्या पदभार ग्रहण केले.
घुग्घुस येथे आगमन व पदग्रहण निमित्य घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे,एसी सेल के जिल्हाध्यक्ष पवन अगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, बालकिशन कुळसंगे, कल्याण सोदारी, नौशाद शेख, देवानंद ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचा स्वागत केला.