मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या नागभीड तालुक्यात  – गोसेखुर्द प्रकल्पाची करणार पाहणी

0
460

चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून कोरोना संकटाच्या काळात प्रथमच दौऱ्यावर येत असल्याने प्रचंड गोपनीयता या दौऱ्याबद्दल प्रशासनाने बाळगली आहे… सकाळी 11 वाजता ते पवनी तालुक्यातील वाई येथे येणार त्यानंतर तेथील गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर ते दुपारी 2 वाजता नागभीड तालुक्यातील किरमटी मेंढा येथिल सुरू असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्याची पाहणी करणार आहेत.

गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामात होणारी अनियमितता,होणारा भ्रष्टाचार,पाण्यापासून शेतकरी वंचित या सारख्या अनेक तक्रारी सात्यत्याने होत असल्याने मुख्यमंत्री या प्रकल्पाच्या कामात गती यावी यासाठी हा पाहणी दौरा करणार आहेत.
या दौऱ्यासाठी नागभीड तालुका पोलीस प्रशासन,महसूल प्रशासन सज्ज झालेले आहे.