ब्राऊन शुगरसह आरोपीस अटक ; 1 लाख 25 हजाराचा मुद्देमाल जप्त

0
327

चंद्रपूर : शहरात मादकदव्याची तस्करी करताना ब्राऊनशुगरसह एका आरोपी वरोरा नाका चौकात आज सोमवारी अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. अजय रविदास मु. लालपेठ चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे.

8 मार्चला वरोरा नाका चौकात मादक पदार्थाची तस्करी होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. माहितीच्या आधारे संदीप कपडे यांनी सापळा रचत आरोपी अजय रविदास राहणार लालपेठ चंद्रपूर याला अटक केली. आरोपी कडून 25 ग्राम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आले असून त्याची किंमत तब्बल 1 लाख 25 हजार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here