महिलादिनी : महा विकास आघाडीच्या महिला मंत्र्यांना साकडे

0
71

यशोमती ठाकूर,वर्षा गायकवाड व आदिती तटकरे ह्या महिला मंत्र्यांच्या प्रतिमेसमोर महिला कामगारांची प्रार्थना

• कोविड योद्यांचे डेरा आंदोलनाकडे शासनाचे दुर्लक्ष

चंद्रपूर : आज ८ मार्च रोजी जागतिक महिला दिना निमित्त वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शेकडो महिला कामगारांनी राज्याच्या महाविकास आघाडी सरकार मधिल महिला मंत्र्यांना 7 महिन्यांचा थकीत पगार व किमान वेतनासाठी साकडे घातले. राज्य मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या यशोमती ठाकूर,वर्षा गायकवाड व आदिती तटकरे या महिला मंत्र्यांच्या प्रतिमेसमोर डेरा आंदोलनातील
महिला कामगारांनी प्रार्थना करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

मागील एक महिन्यांपासून वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांना 7 महिन्यांचे थकीत पगार व किमान वेतन देण्यात यावे या मागण्यांसाठी जन विकास कामगार संघाचे नेतृत्वात मुलं-बाळ व कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डेरा आंदोलन सुरू आहे. कोविड योद्धा कामगारांचा थकीत पगार देण्यासाठी सर्वच स्तरावर वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे.मात्र चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय व राज्याचे वैद्यकीय शिक्षण विभाग आपल्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी थातूर-मातूर कार्यवाही करण्यात वेळ घालवत असल्याने कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची परिस्थिती निर्माण झालेली आहे.

महाविकास आघाडीतील महिला मंत्र्यांनी तरी महिला कामगारांची वेदना समजून घ्यावी या हेतूने आज जागतिक महिला दिनी डेरा आंदोलनातील शेकडो महिला कामगारांनी राज्याच्या मंत्रिमंडळातील यशोमती ठाकूर,वर्षा गायकवाड व आदिती तटकरे ह्या महिला मंत्र्यांच्या प्रतिमेसमोर महिला कामगारांची प्रार्थना करून मागण्याकरीता साकडे राज्य शासनाने लक्ष वेधून घेतले.
चंद्रपुरातील कोविड योद्यांनी महिनाभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डेरा आंदोलन सुरू करून ७ महिण्याचे थकित वेतन देण्यात यावे तसेच किमान वेतनाची मागणी तातडीने करून आंदोलकांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

यावेळी जन विकास कामगार संघाच्या महिला पदाधिकारी कांचन चिंचेकर,शेवंता भालेराव, ज्योती कांबळे, निलिमा वनकर, तारा ठमके, सुनीता रामटेके, गीता दैवलकर, अनिता राजपुरोहित ,रोशनी कालेस्पोर, हेमलता देशपांडे, संगीता बावणे, सुवर्णा नवले, सारीका वानखेडे,शालू शेंडे,प्रतिमा शाह, सिंधू चौधरी,सीमा वासमवार,पुष्पा गुम्मलवार, कांताबाई गेडेकर, वर्षा कातकर, निलिमा पांडे, रोशनी नाहरकर, मीना समुंद,कविता सगौरे, सपना दुर्गे, रजिया पठाण, शीतल गेडाम यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here