घुग्घूस : कोरोना, लोकडॉऊन यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे, या कारणाने जिल्ह्यात गुन्ह्यांच्या घटनेत वाढ होत आहे. राजुरा येथे राहणाऱ्या 45 वर्षीय संध्या पडवेकर यांच्या मुलाचे लग्न असल्याने नातेवाईकांना कपडे व पत्रिका वाटप करण्यासाठी त्या घुग्घूस, अमराई वार्ड येथे राहणारे संध्या पडवेकर यांचे मोठे जावई यांच्या घरी आल्या होत्या.
6 तारखेला लग्नाच्या पत्रिका वाटप झाल्यावर, दुसरे दिवशी नातेवाईकांना कपडे व इतर कामे आटोपल्यानंतर 7 एप्रिलला त्या आपल्या घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या, घुग्घूस बस स्थानक येथे पोहचले, पडवेकर यांच्या हाती प्लॅस्टिकची थैली त्यामध्ये लाकडी रंगाचा पर्स होता, बस आल्याने पडवेकर ह्या बसच्या दारात जात असताना अचानकपणे त्यांच्या अवती भोवती महिलांचा घोळका जमा झाला, गर्दीत त्यांनी आपला मार्ग शोधत बसमध्ये प्रवेश केला.
काही वेळात बस ची तिकीट काढत असता प्लास्टिक ची थैली फाटल्या अवस्थेत होती व त्यामधील पर्स हा गायब होता. त्यांच्या समोर काही अज्ञात महिलांनी गर्दीचा फायदा घेत ती पर्स चोरली असा संशय त्यांना आला, पडवेकर यांनी घुग्घूस पोलीस स्टेशन गाठले व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पर्स मध्ये मोबाईल व रोख 28 हजार रुपये चोरी झाल्याची तक्रार संध्या पडवेकर यांनी दिली. काही दिवसांपूर्वी असाच प्रकार चंद्रपुरातील मुख्य बस स्थानकावर घडला होता, प्रवासी ज्या वेळेत बसमध्ये चढण्याच्या तयारीत असतात नेमकं त्याचवेळी अज्ञात आरोपी गर्दी जमवित हा प्रकार घडवून आणतात. घुग्घूस पोलिसांनी 379 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहे.