दारुबंदी असलेल्या चंद्रपुर जिल्हयातुन दारु वाहतुक करण्याचे कारण काय?

शासन निर्णयच ठरतोय दारु तस्करीला पोषक

वाहतुक परवाना तस्करीचा मुख्य स्त्रोत;दारूबंदी असलेल्या जिल्ह्यातून जातात दारूची वाहने

चंद्रपूर : कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर बऱ्याच कालावधी पर्यंत जिल्हाबंदी व टाळेबंदी असल्याने दारुबंदी असलेल्या जिल्हयातील तळीरामांची चांगलीच गोची झाली होती. परंतु टाळेबंदीत शिथीलता दिल्यानंतर शासन निर्णयच दारु तस्करांकरीला पोषक असल्याचे शिरपुर येथे दारु वाहनावर झालेल्या कारवाईतुन उघड होत आहे. चंद्रपुर जिल्हयात पुर्णतः दारुबंदी करण्यात आली आहे. परंतु दारुची होणारी तस्करी थांबविण्याकरीता प्रशासनाजवळ कोणतीही नियमावली नाही. दारुबंदीच्या कालखंडजिल्हयात होणारा दारुचा पुरवठा शासन प्रशासनाच्या डोळयात अंजन घालणारे आहे.

दारु तस्करीकरीता जिल्हा व सिमावर्ती भागातील लिकर किंग ने विविध फंडे अजमावत तळीरामांच्या व्यसनाची पुर्तता केली आहे. याकरीता शालेय विदयाथ्र्यापासुन तर महामंडळाच्या बसचा वापर करण्यात आला सोबतच दुचाकी व चारचाकी वाहनाच्या टयूबमधुन सुध्दा दारुची तस्करी करण्यात आली.
प्रशासनासोबत सलगी साधत लहानसहान वाहनाचा वापर केल्या गेला आता तर चक्क वाहतुक परवानाच तस्करीचा मुख्य स्त्रोत झाल्याचे दिसत आहे.
4 जून गुरुवारी रोजी सायंकाळी यवतमाळ ते उमरेड करीता गोल्डन लिकरर्स या दुकानातील 250 पेटया संत्रा राॅकेट कंपनीची देशी दारु घेवुन वाहन क्रमांक एम. एच. 40 बी. जी. 8749 निघाले होते. हे वाहन शिरपुर पोलीस स्टेशन हददीत येत असलेल्या चंद्रपुर जिल्हयाच्या सिमेजवळील बेलोरा फाटा येथे अडविण्यात आले.
वाहनात असलेल्या दारुचा वाहतुक परवाना तपासला असता वाहतुक परवाण्यावरील मार्ग बघुन पोलीस प्रशासन चक्रावले. यवतमाळ येथील राजु वाईन्स एजंन्सीतुन दिलेल्या वाहतुक परवान्यावर उमरेड ला जाण्याचा मार्ग संशयास्पद होता.
वास्तविक पाहता परवाना असलेली दारु चंद्रपुर जिल्हयातुन वाहतुक होणार होती मात्र परवान्यावर चंद्रपुर जिल्हयातील एकाही गावाचा उल्लेख करण्यात आला नव्हता.
दारुबंदी असलेल्या चंद्रपुर जिल्हयातुन दारु वाहतुक करण्याचे कारण काय?

सदर दारु चंद्रपुरात तर उतरविल्या जाणार नव्हती ना?
शंभर किलोमीटर चा जास्तचा प्रवास करुन वाहतुक करण्याचे कारण काय?
असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
शासनाच्या निर्णया नुसार दारु वाहतुकीला कोणतीही नियमावली नाही.
अनुज्ञप्ती धारकाला त्याचे ईच्छे नुसार दारुची वाहतुक करायची आहे त्या नुसार तो आपल्या सोयीने वाहतुक परवाना तयार करीत असल्याचे वास्तव उजेडात आले आहे.
यात दारुबंदी जिल्हयातुन वाहतुकीला प्राधान्य देण्यात येत असल्याने शासन निर्णयच दारुबंदी ला पोषक ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सध्यस्थितीत कोरोनामुळे जिल्हाबंदी व नाकाबंदी असल्याने वाहतुक परवानाच दारु तस्करीचा मुख्य स्त्रोत बनला आहे.

  • अरेच्चा ते दारुचे वाहन सोडले

  • दारुची वाहतुक करतांना गंतव्यस्थाना पर्यंत मार्गावरील मुख्य गावांची नावे दर्शवावी लागते. परंतु यवतमाळ वरुन देशी दारुसह निघालेले वाहन शिरपुर पोलीसांनी अडविले.वाहतुक परवान्यावर असलेला मार्ग संशयास्पद असल्यामुळे ठाणेदार अनिल राऊत यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र पाठवुन वाहतुक परवान्यावरील मार्गा विषयी माहिती मागीतली असता अनुज्ञप्ती धारक त्यांचे मर्जीने माहाराष्ट्रात कोणत्याही मार्गाने मार्गक्रमण करण्याची शासन निर्णय असल्याने सदर वाहन कार्यवाहीस पात्र ठरत नसलयाने ते दारुचे वाहन सोडण्यात आले आहे.