रेड जोन यवतमाळ येथून चंद्रपुरात ‘ रॉकेट ‘ सुखरूप पोहोचले !

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : शहर गाठ झोपेत असताना तळीरामांची तहान भागविण्यासाठी देशी दारूच्या ( रॉकेट ) जवळपास आठशे पेटया बुधवारला मध्यरात्री पोचल्याची माहिती आहे. या निमित्ताने संघटित दारूतस्करीचा प्रयोगाला प्रारंभ झाला आहे. हा साठा आता तस्करांच्या ‘ मोहल्ला कमिट्यांपर्यंत पोचविला जाणार असून लवकरच तो तळीरामांच्या सेवेत पाठविला जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे.

मात्र दारूचा तुटवडा टाळेबंदीचा दीड महिना वगळता फारसा जाणवला नाही. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर दारूतस्करीला पुन्हा सुरवात झाली. आजवर दारूतस्कर वैयक्तिकरीत्या दारू आणायचे . मात्र काही दिवसांपूर्वी संघटितरीत्या दारूतस्करी करण्यासाठी शहरातील प्रतिष्ठित हॉटेल मध्ये तस्करांच्या बैठकांचे सत्र पार पडले. या बैठकीत तस्करीचा आराखडा तयार करण्यात आला. विभागावर माणस नेमण्यात आली.

पोलिस ठाण्यांचे रेट ‘ ठरले. दारूतस्करीचे अनधिकृत परवानेच वाटण्यात आले. दारूतस्करांच्या अक्षरशः ‘ मोहल्ला कमिट्या’च स्थापन करण्यात आल्या. मात्र या कमिट्यांमध्ये स्थान न मिळालेल्या काही असंतुष्टांनी याची वाच्यता केली आणि संघटित दारूतस्करीचे बिंग फुटले. गृहमंत्र्यांकडे यासंदर्भात अनेक तक्रारी केल्या. श्रमिक एल्गारच्या अँड.पारोमिता गोस्वामी यांनी यामागे राजकीय पाठबळ असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली. त्यामुळे संघटित दारूतस्करीचा प्रयोग काही दिवस थंडबस्त्यात टाकण्यात आला. दरम्यानच्या काळात पोलिसांनी दारूतस्करांविरोधात धाडसत्र सुरू केले. कोट्यवधी रुपयांचा माल जप्त केला. अनेक छोट्या तस्करांच्या मुसक्या आवडल्या. याकाळात संघटित दारूतस्करांची चर्चा थंडावली. हीच संधी साधून आता मोहल्ला कमिट्या कमिट्या ‘ सक्रिय झाल्या.

काल बुधवारला यवतमाळ येथून पहिली खेप त्यांच्यासाठी पाठविण्यात आली. अनेक पोलिस चौक्या आणि पोलिस ठाण्यांना वाकुल्या दाखवत देशी ( रॉकेट ) दारूच्या जवळपास आठशे पेट्या चंद्रपूर शहरात मध्यरात्री पोचल्या. रामनगर आणि शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्या उतरविण्यात आल्या. रात्रीचसंबंधित माणसांकडे साठा पाठविण्यात आला. दरम्यान शंभर पेट्या गस्तीवरील पोलिसांच्या हाती लागल्या. मात्र संघटित दारूतस्करीचा पहिला दिवस होता. याची जाणीव याची जाणीव पोलिसांना तस्करांनी करून दिली. त्यामुळे तो साठा सोडला अशी माहिती याच क्षेत्रातील जाणकारांनी दिली. बाबुपेठ, रय्यतवारी, महाकाली परिसरातील गोल वर्मा, एनडी, अमिता गुप्ता ( सध्या फरार ) यांच्यासह काही जणांकडे हा माल सुपूर्द केल्याची माहिती आहे.

यवतमाळातील जयस्वाल आणि घुग्घुस येथील एक ‘रईस’ यांच्या देखरेखीत देशी दारूचा साठ चंद्रपुरात सुखरूप पोहचला आणि अशा त – हेने संघटित दारूतस्करीचा श्रीगणेशा करण्यात आला.