पालगाव आवड पुर बीबी परिसरात वाघाची दहशत अनेकांना झाले वाघाचे दर्शन

0
222

कोरपना : मागील चार ते पाच दिवसापासून अल्ट्राटेक सिमेंट कंपनी ला लागून असलेल्या नोकरी व पालगाव याठिकाणी असलेल्या कोळसा खाणीच्या परिसरात वाघाचे दर्शन अनेकांना झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले असून अल्ट्राटेक कंपनी व्यवस्थापनाच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये वाघाचे दर्शन झाल्याचे दिसते मागील आठवड्यात सदरचा वाघ पैनगंगा क्षेत्रीय प्रकल्पाच्या परिसरात आढळून आल्याचे सुद्धा बोलल्या जात होते अनेकांच्या मते तूच वाघ मध्ये आला असल्याचे समजते मागील वर्षी याच महिन्यात सिमेंट कंपनी च्या अखत्यारीत असणाऱ्या परिसरामध्ये वाघाची दहशत निर्माण झाली होती व वन विभागाच्या माध्यमातून सदर वाघाला जेरबंद सुद्धा करण्यात आले होते मात्र पुन्हा ह्या वर्षी सुद्धा पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे