गोल्ड मेडलिस्ट अश्विनी जिभकाटे बनली एकदिवसाची सरपंच

0
353
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• कोंढा ग्रामपंचायत मध्ये महिला दिनानिमित्त नाविण्यपुर्ण उपक्रम

• विद्यमान सरपंच महोदयांनी पटवून दिल्या विविध योजना

भंडारा : स्त्री म्हणजे वास्तव… स्त्री म्हणजे मांगल्य… स्त्री म्हणजे मातृत्व आणि स्त्री म्हणजे कतृत्व. याच कतृत्वाच्या जोरावर महिला विविध क्षेत्रात आपले कर्तव्य बजावत आहे. मग समाजकारण असो की राजकारण. अशाच एका उच्च शिक्षित डाॅ. महिला सरपंच डॉ. नूतन विलास कुर्झेकर यांनी गावातील सुवर्ण पदकाच्या मानकरी असलेल्या गणिताचे सहायक व्याख्याता अश्विनी धनराज जिभकाटे ह्यांना एका दिवसाठी आपल्या सरपंच पदाचा मान दिला. आणि ही वेळ होती, जागतिक महिला दिनाची. जागतिक महिला दिनी महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यांचा गौरवही केल्या जातो. मात्र भंडारा जिल्ह्यातील कोंढा ग्राम पंचायतीमध्ये एका दिवसासाठी बहाल करीत राबविलेला उपक्रम आज चर्चेचा विषय ठरला आहे. गाव विकासात सरपंचांची भूमिका काय? असते याची प्रचिती माध्यमातून करून देण्यात आली.

काल 8 मार्च ला जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय कोंढा येथे महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सरपंचा डॉ. सौ. नूतन विलास कुर्झेकर यांनी एकदिवसीय सरपंच पद कोंढा गावातील ४ सुवर्ण,1 रौप्य पदक (एम. एस. सी, गणित) बी. एड, सध्या आनंदवन, वरोरा येथे गणिताचे सहायक व्याख्याता म्हणून कार्यरत अश्विनी धनराज जिभकाटे यांनी भुषवावे, तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्विकारावे अशी विनंती केली होती. सर्व प्रथम ह्या घोषणेमुळे त्या आश्चर्य चकीत झाल्या. महिला दिन असल्याने विद्यमान सरपंच यांचा स्वतः चा निर्णय असल्याने अश्विनी जिभकाटे तयार झाल्यात.
त्या नंतर त्यांच्याच हस्ते क्रांतीज्योती सावित्री मातेच्या फोटोचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याच कार्यक्रमाचे औचित्य कोंढा गावातील 12 वी त प्रथम ठरलेल्या कु. स्तेजल नारद बोरकर, 10 वी त प्रथम कु. प्रतिक्षा धनपाल जिभकाटे व सोबतच ज्यांना एकदिवसाचा सरपंच पदाचा मान बहाल करण्यात आलेल्या गोल्ड मेडलिस्ट अश्विनी धनराज जिभकाटे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका आशा लेदे, सरिता टेंभुर्णे, त्रिवेणी माकडे, विमल कावळे, भागिरथा टेंभुर्णे, आशा सेविका वर्षा जांभूळकर, दिव्या मेश्राम, अंगणवाडी मदतनीस मोहरकर बाई, अंजू सेलोकर, तरेकर बाई, राऊत बाई, वैशाली ताई, जि.प. प्राथमिक शाळा कोंढा येथील मुख्याध्यापिका पडोळे मॅडम, व सर्व शिक्षिका, ग्रामपंचायत सदस्या मोहरकर ताई, टेंभुर्णे ताई, माकडे ताई, सदस्य चुडामनजी वैद्य, संजयजी कुर्झेकर तसेच महिला बचत गटातील महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान महिलांनी स्वयंस्फूर्तीने गाणी गायली, लहान मुलींनी नृत्य सादर केलेत. तर काही महिलांनी त्यांच्या मनोगतातून सर्वांना भावुक केले.
एकदिवसीय सरपंच पदावर विराजमान अश्विनी व इतर विद्यार्थीनींना ग्रामपंचायतीचे कामकाज करण्याची पध्दत कशी असते? कामकाज कसे चालते? घरकुल असो की अन्य योजना कशा लोकांपर्यंत पोहोचविल्या जातात आदींसह विविध प्रकारची माहिती सरपंचा डॉ. नूतन विलास कुर्झेकर यांनी दिली.
गणिताचे सहायक व्याख्याता असलेल्या एकदिवसीय सरपंचा कु. अश्विनी धनराज जिभकाटे यांनी महिलांच स्थान जगात किती महत्त्वाचे आहे तसेच पालकांनी मुलगा , मुलगी भेदभाव न करता, त्यांचे समानरित्या संगोपन करावे, असे मनोगत यावेळी केले. त
गावातील इतर मुलींना प्रेरणा मिळावी व आपणही एक दिवस असंच काही मोठं करावं या हेतूने सरपंचा डॉ. सौ. नुतन विलास कुर्झेकर यांच्या कल्पनेतून हा आगळावेगळा कार्यक्रम सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगणक परिचारिका रजनी प्रकाश कुर्झेकर यांनी तर आभार सरपंचा डॉ. नूतन विलास कुर्झेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरिता ग्रामपंचायत कर्मचारी अरुण कुर्झेकर, लिलाधर जिभकाटे, राजू देशमुख, मनोहर जिभकाटे या सर्वांनी सहकार्य केले.