चंद्रपुरातील जायकाला भीषण आग; ५० ते ६० लाखांचे नुकसान

0
1295
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर :

शहरातील बाजार वॉर्ड येथील जायका हॉटेलला भीषण आग लागली असून या आगीत जवळपास ५० ते ६० लाखांचे नुकसान झाले आहे. हि आग शॉर्ट सर्किट ने लागल्याची माहिती हॉटेल मालक मसूद खान यांनी दिली आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या हॉटेल जायका ला रात्री १.३० च्या सुमारास भीषण आग लागली.

या घटनेची माहिती नागरिकांनी हॉटेल मालक मसूद खान यांना दिली.त्यानंतर अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले.तो पर्यंत संपूर्ण हॉटेल जळून खाक झाले होते.या आगीत जवळपास ५० ते ६० लाखांचे नुकसान झाले आहे.